न्यूज
ब्रेकिंग

IMG-20261103-WA1094 चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया.. या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद धुळ्याचे लोटन पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ सुपूर्द

IMG-20261104-WA0654 साहित्य श्रेत्रातील बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या जळगांव जिल्हाध्यक्ष पदी बापुराव ठाकरे  यांची नियुक्ती.

IMG-20261103-WA1093 साने गुरुजी कन्या हायस्कूल अमळनेर मध्ये पर्यावरण पूरक विविध शैक्षणिक उपक्रम 

IMG-20261103-WA0943 दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, आदिवासी व वंचितांच्या न्याय हक्कांसाठी लोकसंघर्ष मोर्चा आक्रमक; मुख्यमंत्र्यांना २२ विषयांचे निवेदन!

IMG-20261103-WA0935 दुष्काळाच्या संकटात शेतकरी-शेतमजुरांची आर्थिक कोंडी; खासगी सावकारांसह बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी!

तीर्थक्षेत्र नीरा नरसिंहपुर येथील श्री स्वयंभू गणेश मंडळाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सदिच्छा भेट.

अपनी भाषा में पढ़े! Translate

तीर्थक्षेत्र नीरा नरसिंहपुर येथील श्री स्वयंभू गणेश मंडळाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सदिच्छा भेट.
पिंपरी बुद्रुक :
दिनांक -12/09/2024 प्रतिनिधी: समाधान रजपूत.

. पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेले तीर्थक्षेत्र नीरा नरसिंहपुर येथील श्री स्वयंभू गणेश मंडळाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी नरसिंहपुर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरा नरसिंहपुर मध्ये लोकसंख्येच्या मानाने गावठाणा मध्ये जागा कमी असल्याने बरीशी कुटुंबे ही गायरान क्षेत्रामध्ये वास्तव्य करीत आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये या गायरान क्षेत्रातील 110 कुटुंबांना हटवण्याची चर्चा होती. पण ही सर्व कुटुंबे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी यांची घरे वाचवली. आपण गायरान क्षेत्रातील कुटुंबांना त्यांची घरे व जागा नावावर करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू व आपणाला आपल्या समस्येचे समाधान करून देण्यात येईल असा शब्द पाटील यांनी येथील जनतेला दिला.
हर्षवर्धन पाटील यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. येथील जनतेने तसेच कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन भाऊंना आम्ही आपल्या सोबत कायम असल्याचा शब्द दिला.
यावेळी निरा नरसिंहपुर विकास आराखड्यामध्ये 110 कुटुंबांची घरे काढण्याची चर्चा होती. त्यावेळी हर्षवर्धन पाटील हे या कुटुंबांच्या मागे ठाम उभे राहिले व त्यांनी लोकांची घरे वाचवली म्हणून येथील लोकांनी त्यांचा सत्कार केला व आभार मानले.
या कार्यक्रमासाठी निरा नरसिंहपुर गावचे डेप्युटी सरपंच गुरुदत्त गोसावी, श्री स्वयंभू गणेश मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब घोडके, इंदापूर तालुका भाजप सचिव विलासजी ताटे, अतुल घोगरे, डॉक्टर सिद्धार्थ सरवदे,विठ्ठल धोत्रे, उमेश घोडके, बळीराम गलांडे, अक्षय घोडके, गौतम जाधव, भारत जाधव, सोजर जाधव, वंदना घोडके, माऊली जाधव, आकाश जाधव, नामदेव जाधव, आर्यन घोडके, सौरभ जाधव, सुजित जाधव, सोमनाथ शिंदे, गणेश शिंदे, दिपक जाधव, नवनाथ जाधव, दादासाहेब घोडके, समाधान घोडके, महेश मोरे, विलास जाधव, पंकज जाधव, धनंजय घोडके, मनोज घोडके, सचिन जाधव, भाऊ शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!