June 29, 2025 8:05 am

पारोळा पोलीस स्टेशन कडुन मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाची उकल….

अपनी भाषा में पढ़े! Translate

पारोळा पोलीस स्टेशन कडुन मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाची उकल….

प्रतिनिधी मयूर पाटील

पारोळा पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकास गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे किशोर संजय चौधरी रा. तरवाडे ता. पारोळा ह.मु. सातपुर कॉलनी, नाशिक. हा नाशिक शहरातुन व इतर परीसरातुन दुचाकी चोरुन पारोळा पो.स्टे. हददीतील आडगाव, तरवाडे, शिवरे व परीसरात कमी किमतीत विकतो. तो पुन्हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्यास पारोळा पो.स्टे. हददीत येणार आहे त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक श्री सुनिल पवार यांनी पारोळा पो.स्टे. च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजु विठठल जाधव, पोहेकॉ/२७१८ प्रविण विश्वास पाटील, पोना/३०७४ संदिप सातपुते, पोकों/अभिजित पाटील यांना तात्काळ किशोर संजय चौधरी याची माहिती घेवुन पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत

त्यावरुन नमुद पथक हे साधारण ३ दिवसा पासुन पारोळा शहर व हददीत किशोर संजय चौधरी याचा कसोशीने शोध घेत होते. दिनांक १२/०९/२०२४ रोजी पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात ईसम नामे किशोर संजय चौधरी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास विचारपुस केली असता आरोपी किशोर संजय चौधरी याने नाशिक शहर हददीतुन व परिसरातुन मोटार सायकली चोरी केले असल्याचे कबुली दिली असुन त्याचेकडुन चोरी केलेल्या १९ मोटार सायकली हस्तगत करुन जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच नाशिक शहर व परिसरातील विविध पोलीस स्टेशन कडील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत

सदर कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेडडी पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर पवार, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगाव मा सुनिल नंदवाळकर उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर भाग, याचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.

जनसंपर्क अधिकारी, जळगाव. पोलीस अधिक्षक कार्यालय जळगाव.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!