राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इंदापूर तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदी किरण लावंड यांची नियुक्ती
(निलेश गायकवाड)
इंदापूर राष्ट्रवादी विदयार्थी काँग्रेस च्या अध्यक्ष पदी किरण लावंड यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आले.ही नियुक्ती पुणे जिल्हा अध्यक्ष स्वराज देविदास तुपे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार व इंदापूर तालुका अध्यक्ष महारुद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवड करण्यात आली.
लावंड यांनी विविध सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली असल्याने ही नियुक्ती करण्यात आली. तसेच लावंड यांनी बोलताना सांगितले शरद पवार साहेब यांचे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार तळागाळातील लोकांन पर्यंत पोहचवणार असल्याचे सांगितले.