बदलापूर व कोलकत्ता घटनेच्या निषेधार्थ बेला येते जन आक्रोश रॅली संपन्न
प्रतिनिधी :- अखिल रोडे
महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्हा येथील बदलापूर गावातील शाळेमधील तीन व सहा वर्षाच्या दोन चिमुकलीवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व कोलकत्ता येथे डॉक्टरचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बेला येथे जन आक्रोश काढण्यात आली होती. या जन आक्रोश्र रॅली मध्ये शाळेतील विद्यार्थिनी, महिला, व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बलात्कारी,नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा, कठोर कायदा करून, महिलांना संरक्षण देण्यात यावे या मागण्याची निवेदन बेला पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री प्रशांत लभाने व अप्पर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार, मनोज वाडे यांना निवेदन देण्यात आले
या जन आक्रोश रॅलीचे आयोजन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सौ तक्षशिला वाघधरे, सौ मनीषा लोहकरे, सुवर्णा डांगरे, सीमा कांबळे, माया थुल, अलका कोटमकर,रागिणी ठाकरे, अंतकला कोराम,सुनीता वाहूकर,नलू कडू, छाया ढेंगरे, पुष्पा कांबळे, निर्मला पाणबुडे, पुरुषांमध्ये पंचायत समिती सदस्य तथा गटनेते श्री पुष्कर डांगरे, बेला काँग्रेसचे अध्यक्ष श्री दादा शेंडे, गजानन लांडे, माजी सरपंच श्री सुभाष तेलरांधे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन बालपांडे, खरेदी-विक्रीचे संचालक सुरज कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री पुरुषोत्तम चिंचोलकर, अनिल तीमांडे, महादेव आमनेरकर, अंकित तळवेकर, महादेव मरस कोल्हे, रघुनाथ माहुरकर, शिवा अवधूत,दिलीप घीमे, दिलीप झिले, राजू कावळे व मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थिनी महिला व पुरुष उपस्थित होते.