ऋषीतुल्य व्यक्तिमत्व हरवले… कै.कल्याणराव नाथसाहेब बंडगर यांचे अल्पशा आजाराने निधन
(निलेश गायकवाड)
ऋषीतुल्य व्यक्तिमत्व अशी ज्यांची ख्याती होती इंदापूर तालुका खरेदी विक्री संघांचे माजी संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंत बंडगर यांचे वडील कल्याणराव नाथसाहेब बंडगर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
भाऊंचे व्यक्तिमत्त्व गेल्या वीस वर्षापासून आपण पाहतोय..!भाऊंच्या पीळदार मिशा परिसरात चर्चेचा विषय असायचा. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व,गोड वाणी, सकारात्मक विचारसरणी तरुणांना मार्गदर्शक ठरणारी होती.भाऊंचे शुभ्र धोतर, सदरा, डोक्यावरची भट्टी केलेली टोपी आणि पीळदार मिशा अशी भाऊंची राहणीमान… सर्वासामान्य आपुलकी आणि आधार वाटायची.
भाऊंचा सहवास व मार्गदर्शन जि प सदस्य हनुमंतनानां बरोबरच मदनवाडी गावाला सातत्याने राहायचा. गावातील विविध सामाजिक विषयावर भाऊंनी पुढाकार घेतला. इंदापूर तालुका खरेदी विक्री संघांचे संचालक ते आज तागायत भाऊंचे सामाजिक क्षेत्रात कार्य उल्लेखनीय आहे.
आज दि. 27 ऑगस्ट रोजी भाऊंचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने बंडगर व मदनवाडी गावावर शोककळा पसरली. खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, मा. मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने, अंकिता पाटील विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोषल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली.