June 29, 2025 3:07 am

शिवसेनेच्या राज्य संघटकपदी अँड ललिता श्याम पाटील यांची नियुक्ती.

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिवसेनेच्या राज्य संघटकपदी अँड ललिता श्याम पाटील यांची नियुक्ती.

 

अमळनेर : विक्की जाधव. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या महाराष्ट्र राज्य संघटकपदी अँड ललिता श्याम पाटील यांची नुकतीच नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांच्या यां निवडीचे संपूर्ण जिल्ह्यात स्वागत होत आहे.

 श्री गोगाजी नवमी उत्सव व छडी मिरवणूक निमित्त सर्व भाविक भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा.

शुभेच्छुक : श्री. बुद्धा भैया जाधव. श्री. विक्की भाऊ जाधव. श्री. विशाल जाधव.

नुकतीच लोकसभा निवडणुकीत त्यांनी केलेले भरीव काम त्यांच्यातील कार्यकर्ते संघटन आणि भाषण कौशल्य तसेच आत्ताच अमळनेर येथे झालेला शिवसेनेचा मेळावा त्यांनी यशस्वी केला. या मेळाव्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू

असताना त्यांची राज्य संघटक पदी झालेली नियुक्ती ही त्यांच्या कार्याची पावती मानली जात आहे. या थोड्याच अल्पावधीत त्यांच्या निवडीने अमळनेर तालुका व शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्क प्रमुख गुलाब वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, डॉ. हर्षल माने, महानंदाताई पाटील, युवासेना सचिव विराज कवाडिया, जिल्हा युवासेना प्रमुख निलेश चौधरी यांच्यासह अमळनेर शहरातील शिवसेना पदाधिकारी व अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

नुकतीच अमळनेर येथे झालेला शिवसेनेचा मेळावा त्यांनी स्वतः गाजवतं यशस्वी केला होता.

यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत साहेब यांच्याकडे अमळनेर ची जागा सेनेला सोडावी असा आग्रहा धरला होता. जर तालुक्यातील राजकीय गणिते चढ-उतार होऊन बिघडली तर अँड. ललिता पाटील यांचा विचार केला जाईल यात शंका नाही.

अँड ललिता पाटील यांच्याकडे संघटन कौशल्य असून संपूर्ण तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क देखील आहे. त्यांना नव्या उमेदवारासारखे तालुक्यात फिरण्याची गरज भासणार नाही असं तरी सध्याचे चित्र दिसत आहे. सोबत शिवसेनेची जुनी आणि नवी फळी एकत्र मिळून जोमाने काम करतील यात शंका नाही.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!