January 29, 2025 9:03 pm

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात, मोठमोठ्या शिखरावर अभेद्य असे किल्ले बांधले त्यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे.

अपनी भाषा में पढ़े! Translate

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात, मोठमोठ्या शिखरावर अभेद्य असे किल्ले बांधले त्यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे.

मार्मिक : न्यूज नेटवर्क, विक्की जाधव 

संबंधित घटनेमुळे शिवप्रेमींममध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच विरोधकांकडूनही संताप व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या राजकोट किल्ल्यात शिवरायांचाहा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. नौदल दिनाच्या दिवशी भव्य कार्यक्रम आयोजित करुन या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे.

 

विरोधकांकडून भ्रष्टाचारामुळे ही घटना घडल्याचा दावा केला जातोय.

दरम्यान, पुतळा कसा कोसळला याची सर्व कारणीमांसा जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण घटनास्थळी भेट देणार आहेत. राजकोट किल्ला परिसर पूर्णपणे पोलिसांनी वेढला आहे. किल्ल्याच्या आत जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पुतळ्याच्या डागडुजीचं काम युद्ध पातळीवर सुरु झालं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनाच्या निमित्ताने शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण मालवणच्या समूद्र किनाऱ्यावर राजकोट किल्ला परिसरात झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूंचा 35 फुटांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र आज दुपारच्या दरम्यान हा पुतळा कोसळला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी जवळपास 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

हा पुतळा नौदलाने उभारला होता. पण या पुतळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती.

सदर बातमी फक्त शिवप्रेमीच्या माहिती साठी आहे. यात कोणाचेही मन दुखावेल अशी आमची मानसिकता नाही. आमच्या साठी छत्रपती आदर्श आहेत. 

 

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा गंभीर आरोप

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी या घटनेनंतर गंभीर आरोप केले आहेत. “शिवरायांचा पुतळा वर्षभराच्या आतच धाराशाही झाला. शिवरायांचं स्मारक घाई-गडबडीत तयार केलं गेलं. शिवरायांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करायचा होता”, असा आरोप इंद्रजीत सावंत यांनी केला आहे.

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!