November 20, 2024 10:30 pm

जनकल्याण नागरी पतसंस्थेची २७ वी सर्व साधारण सभा संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

जनकल्याण नागरी पतसंस्थेची २७ वी सर्व साधारण सभा संपन्न
जनकल्याण पतसंस्था शिरपूर शहर व तालुक्यात गेली २७ वर्षांपासून सर्व सामान्य ठेवीदार, सभासद यांचा विश्वासावर अतिशय यशस्वी वाटचाल करीत आहे. आज संस्थेत एक हजार सभासद, पन्नास लाखाचे भाग भांडवल अकरा कोटीचा ठेवी तसेच दहा कोटीचा आसपास कर्ज पुरवठा सभासदांना केला आहे संस्थेला दहा लाखाचा जवळपास नफा झाला असून आठ टक्के डिव्हिडंड सभासदांना देण्यात येत असून गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेला सतत अ’ वर्ग लेखा परीक्षणात मिळत आहे. संस्थेतील सभासदांचा गुणवंत मुलांचा सन्मान करण्यात आला. सर्व साधारण सभेतील सर्व विषयांवर सविस्तर विचार विनिमय करण्यात येऊन मंजूर करण्यात आलेत सभेत सभासद राजेन्द्र पाटील यांनी संस्थेचा कारभारावर मौलिक विचार व्यक्त केलेत
सभेस संस्थापक दिलीप लोहार यांनी सभासद व ठेवीदार यांचे आभार व्यक्त करुन आपण ठेवलेला विश्वासाला आम्ही संचालक मंडळ कधीही तडा जाऊ देणार नाहीत. पतसंस्था सोबत अनेक सामाजिक उपक्रम करीत असते तसेच सहकार चळवळीला प्रोत्साहन मिळेल याकरीता सहकार भारतीचा माध्यमातून काम करीत असते
चेअरमन किशोर नामदेव माळी,
कार्यकारी संचालक नितीन जगतसिंग गिरासे ,विजयसिंह जामसिंग पाटील, दिपक मोतीलाल लोहार, शांताराम बाबुराव भिल, अधिकार रामराव माळी,राज देशमुख, मॅनेजर शशीकांत चौधरी,निलेश बडगुजर सर्व अल्पबचत प्रतिनिधी व सभासद उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!