November 21, 2024 9:25 pm

सोनाई प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय…सुप्रियाताई सुळे.

अपनी भाषा में पढ़े! Translate

सोनाई प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय…सुप्रियाताई सुळे.

पिंपरी बुद्रुक
दिनांक :26/08/2024
प्रतिनिधी: समाधान रजपूत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात ६३ वधू वरांचे विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सोनाई प्रतिष्ठानचा सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम स्तुत्य व अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीणभैय्या माने यांनी या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी खासदार सौ. सुळे यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले तसेच प्रविणभैय्या माने व सोनाई प्रतिष्ठानच्या कार्याचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी सौ. सुळे यांनी” पंधराशे रुपयांनी बहिणीचे नाते विकत मिळत नसते” असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीच्या नेत्यांना लगावला.” हवा बदल रही है” असे म्हणत व्यासपीठावर असणारे अनेक मान्यवर लवकरच आपल्याकडे येतील असे सूतोवाच त्यांनी केले. यावेळी खासदार सौ. सुळे, आमदार रोहित पवार यांनी प्रविणभैय्या माने यांचा सत्कार केला.
इंदापूर येथील वाघ पॅलेस पटांगणात झालेल्या या कार्यक्रमात माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, आमदार संजय जगताप, उत्तमराव जानकर, सुदाम इंगळे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, बहुजन मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विधीज्ञ राहुल मखरे, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ,माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, राजेश जामदार, अशोक घोगरे, विधीज्ञ तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, अमोल भिसे, विलास वाघमोडे, बापू जामदार, किसनराव जावळे, सौ. लताताई माने, सौ. अनुराधाताई गारटकर, सुनीताताई वाघ, मंजिरीताई लावंड उपस्थित होते.


सौ. सुळे पुढे म्हणाल्या, सामुदायिक विवाह सोहळ्याचा देखणा कार्यक्रम माने कुटुंबीया च्या आशीर्वादाने होत आहे. माने कुटुंबाचे व पवार कुटुंबीयांचे पाच दशकाचे ऋणानुबंध असून सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथदादा माने व पवार साहेबांचे विश्वास व प्रेमाचे नाते आहे. लोकप्रतिनिधी असल्याने माझे लग्न आई-वडिलांनी खूप साध्या पद्धतीने करून लग्नात एकच पेढा उपस्थितांना देण्यात आला होता अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
यावेळी सोहळ्याचे आयोजक प्रविणभैय्या माने म्हणाले, सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून सोनाई प्रतिष्ठान च्या वतीने यापूर्वी देखील ७५ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा उपक्रम यशस्वी पद्धतीने राबविण्यात आला होता. त्याच बरोबर प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान, नेत्र दान, योग शिबिर, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, कोरोना मध्ये कीट वाटप, दुष्काळात पशुधन जगविण्यासाठी चारा छावणी आदी विधायक उपक्रम राबविले आहेत.
आदरणीय दशरथदादा माने यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सोनाई उद्योग समूहाची यशस्वी उभारणी केली मात्र त्यांचे लग्न सायकल वर तर त्यांनी आमची लग्ने हत्तीवर लावली. आता वधूवरांची लग्ने घोडे, उंटावर लागत आहेत. समाज केंद्रबिंदू मानून काम करण्याचा संदेश आम्हाला आमचे दैवत आदरणीय शरद पवार साहेब व दशरथ दादा माने यांनी दिला आहे. आई, वडील हे आपले दैवत आहेत, त्यांची मनोभावे सेवा करा. तुमचे लग्न सर्व संसारोपयोगी साहित्य देवून लावून दिले आहे मात्र बारश्यास मामा म्हणून बोलविण्यास विसरू नका असे आवाहन त्यांनी करताच जोरदार हशा पिकला.
यावेळी मान्यवरांचे स्वागत सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथदादा माने, सीईओ विष्णूकुमार माने, संयोजक तथा जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीणभैय्या माने, संचालक अतुल माने, किशोर माने यांनी केले. सूत्रसंचालन अमोल धापटे यांनी केले.
चौकट : सामुदायिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करणारे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती, सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविणारे प्रवीणभैय्या माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदारकीचे तिकीट द्यावे अशी जाहीर मागणी यावेळी आपल्या भाषणातून पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित पवार यांच्याकडे उपस्थितांच्या साक्षीने केली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!