ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महा. राज्य तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार 2024 दौंड येथे संपन्न.
प्रतिनिधी- विकी ओहोळ
८४४६११९१५८
दौंड – सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, सांस्कृतिक, साहित्य, कला ,क्रीडा, आरोग्य, शासकीय या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्व समाजसेवक यांच्या कार्याची दखल घेऊन दरवर्षीप्रमाणे ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न गौरव पुरस्कार 2024 प्राईम स्क्वेअर बिल्डिंग कचेरीच्या पाठीमागे दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा पुरस्कार घेण्यासाठी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातून समाज कार्य केलेले समाजसेवक
पुरस्कार घेण्यासाठी आलेले होते ही संस्था सतत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असते या पुरस्कार गौरव सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी मा.नामदेव बापू ताकवणे ,ऐश्वर्या शासम फाउंडेशनचे सर्वेसर्वा दीपक शासम सर, सरकारी वकील कायदेतज्ञ अमोल सोनवणे रील स्टार हर्षदा जाधव, दौंड शहर शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष श्रीकांत ननवरे ,गोपाळ वाडी ग्रामपंचायत सरपंच नीता गिरमे ताई ,पाटस ग्रामपंचायतचे सरपंच भांडलकर ताई , नेत्रतज्ञ डॉ. प्रेम कुमार भट्टड सर, श्रीनाथ क्लासेस गोपाळवाडी संचलिका सौ. चांदणी होले, यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला त्यानंतर ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था तर्फे घेण्यात आलेल्या स्पोकन इंग्लिश क्लासेस मध्ये प्रथम आलेले तीन विद्यार्थी आणि सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व आभार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे सर व संस्थेचे सचिव वैशाली सदाशिव रणदिवे यांनी आभार मानले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे सहकारी दिगंबर पवार ,गणेश हाके ,राहुल कडाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार सर व रवी पवार यांनी केले.