3 वर्ष पासून पार्सल सुविधा बंद असलेली अमळनेर रेल्वे स्टेशनवर पार्सल सुविधा पुन्हा होणार पूर्ववत.
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यांनी मागणी केल्यामुळे रेल्वेस्टेशन वर पार्सल सुविधा सुरू करण्यात येत आहे नुकतीच रेल्वे सल्लागार समिती मार्फत व्यापाऱ्यांना आव्हान केले गेले होते की किती प्रमाणात व कोणकोणते पार्सल या अमळनेर रेल्वे स्थानकावरून, पार्सल होणार आहेत ते कळवावे. याला शेतकरी,व व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद,मिळाला असुन सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून आज 22 ऑगस्ट रोजी रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यां कडून निवेदन देण्यात आले यां वर सकारात्मक चर्चा झाली. लवकरात लवकर पार्सल सुविधा सुरू होऊन नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे
या वेळी अमळनेर रेल्वे स्थानकाचे रवी जी पांडे-अधीक्षक वाणिज्य विभाग,रेल्वे सल्लागार समितीचे-चंद्रकांत कंखरे सर
डॉ.संजय शाह किर्तीलाल पाटील निर्मल कुमार कोचर रहुल किशोर पाटील आदी उपस्थित होते.