June 29, 2025 2:07 pm

रक्षाबंधन कार्यक्रम भैरवनाथ विद्यालयात उत्साहात संपन्न…

अपनी भाषा में पढ़े! Translate

रक्षाबंधन कार्यक्रम भैरवनाथ विद्यालयात उत्साहात संपन्न…
प्रतिनिधी:- प्रा. तुषार वाबळे
भारतीय संस्कृतीत विवीध सणांना अनन्य महत्व त्यात बहीण भावाच्या अतुट नात्यांची गोडी दर्शवणारा सण म्हणजे ‘रक्षाबंधन’ याच सणाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेचे भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.कॉलेज जीवनात खऱ्या अर्थाने ही संस्कृती रुजावी जेणे करुन आजच्या तरुण पिढीला योग्य दिशा प्राप्त होते असा मानस विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार भोसले यांनी मांडून अशा कार्यक्रमास प्राधान्य दिले.यावेळी अकरावी व बारावी कला या दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. या कार्यक्रमाची सुरावत रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस राखी बांधून केली. तदनंतर वृक्ष संवर्धनाचे महत्व जाणून वृक्षांना देखील राखी बांधून विद्यालयातील सर्व विद्यार्थांना राखी बांधण्यात आल्या.यावेळी बारावी कला वर्गाचे वर्गशिक्षक गोडसे ,अकरावी कलाचे वर्ग शिक्षक रेडके सर ,मोरे सर,सौ राऊत मॅडम, सौ.अटोळे मॅडम, सौ.सपकळ, सौ.काझी मॅडम यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!