November 21, 2024 2:10 pm

शिक्षण आणि संस्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिक्षण आणि संस्कार

पिंपरी बुद्रुक
दिनांक – 18/08/2024 प्रतिनिधी: समाधान रजपूत.

संस्कार ही काळाची गरज आहे. योग्य आचार, विचार, गुण,अवगुण हे ओळखण्याची क्षमता म्हणजे संस्कार व शिक्षण यांचा मिलाप झाला तर सुसंस्कारित जीवन घडेल.
शिक्षणामुळे मनुष्यास शहाणपण येते. संस्कारामुळे आयुष्याला वळण मिळते. शिक्षणातूनही संस्कार रुजवावे लागतात. संस्कार ही काळाची गरज आहे. संस्काराची सुरुवात घरापासून होते. शाळा, परिसर हे सुद्धा संस्काराचे केंद्र आहेत.
बालकावर संस्कार कुटुंबातील व्यक्ती करतात. आजोबा,आजी हे तर जुन्या पिढीतील संस्काराची व्यासपीठे होती.विशेषतः आजीबाईचा बटवा उघडला की त्यातून खजिना बाहेर पडत असे गोष्टी, विनोद, असत,नकला असत, जात्यावरच्या गोष्टी, ओव्या असं बडबड गीते व गाणी असं,आयुर्वेद असे. आजी म्हणजे शिक्षण वैद्य, कलाकार या सर्व भूमिका शानदार उठवीत असे. आजच्या पिढीला अशा आजीची कमतरता नक्कीच जाणवत असे. भूमिका पण बालकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असते. शेजारील परिसरातील व्यक्तींचा आदर, वडील बाहेरील परिस्थिती लहानपणी बालकावर रुजत असत. असे संस्कार आई व घरी गरीबीची काटकसरीची व्यवहाराची जाणीव प्रसंगा अनुरूप करून देतात, म्हणून कुटुंब बालकाच्या संस्काराचा पाया आहे.
मुलांवर परिसरातून ही सहज संस्कार होत असतात. घर परिसरात तील वस्ती, गाव संस्कार घडत संस्कृती या मधून चांगल्या वाईट गोष्टी तो शिकत असतो. लहान असल्याने चांगले काय वाईट काय याची जाणीव त्याला नसते म्हणून घरातील व्यक्तीचे त्याच्यावर लक्ष हवे. बाहेरील घडलेली घटना कुटुंबातील व्यक्तींना सांगत असतात त्यावेळी तो जो सांगत आहे ते हे आपण लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. त्याकडे आपण दुर्लक्ष केले तर त्याच वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील.
संस्काराचे मंदिर म्हणजे मराठी शाळा आईचे बोट धरून या मंदिरात पाऊल ठेवते तेव्हा खऱ्या अर्थाने संस्कार व शिक्षण दोन्ही एकत्र सुरू होती.आत्ता मूल विद्यार्थी झालेले असते. सरस्वतीच्या मंदिरात गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली संस्काराचा वटवृक्ष खऱ्या अर्थाने बहरायला सुरुवात होते. शिस्त सवेदनशील, आज्ञाधारकपणा,धीटपणा, बंधुभाव या गुणांचा संगम होतो. गुरुजनांविषयी आपुलकी, आत्म्येता वाटू लागते. शिक्षणातून सहसंस्कार राबविले जातात. परिपाठासारख्या उपक्रमातून राष्ट्रीय मूल्यांचा शिडकाव मनावर होत असतो. गाणी,गप्पा, गोष्टी, कविता विविध महापुरुषांची जयंती,थोरांचे बोल, राष्ट्रीय सण, विविध शालेय उपक्रम, खेळ, चित्रकला या सर्वांचा परिपाठ होऊन संस्काराची मुळे घट्ट रवतात. शाळेतील घटना, प्रसंग, काय शिकवले, अभ्यास कोणता दिला. गुरुजींनी काय ते ऐकून घेतले पाहिजे. शिक्षणाविषयी आधाराची भावना मुलांच्या मनात कशी निर्माण होईल यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न करायला हवा. मुलांची प्रगती, वागणूक याविषयी गुरुजनांची भेट घेऊन जाणून घेतले पाहिजे.
संस्कार हे आज काळाची गरज आहे. बालपणी जिजामातेने संस्काराची बिजे रुजवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. रयतेचे स्वराज्य निर्माण झाले. श्यामच्या आईने श्याम वर उत्तम संस्कार केले,मूल्यांची पाखर श्याम वर केली म्हणून महाराष्ट्राला संवेदनशील मनाचे साने गुरुजी मिळाले. आपण पालक म्हणून वडीलधाऱ्यांचा, गुरुजनांचा आदर, सन्मान करण्यासाठी प्रयत्न केले तर मुलेही विनयशील होतील. त्यामुळे विख्याते व संस्काराचे क्लास लावावे लागणार नाहीत आणि यामुळे आपण संस्कारक्षम पिढी घडवू शकू आणि संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम खऱ्या अर्थाने सुरू होईल.
लेख…..
सौ. सुलताना अन्सार मण्यार.
उपशिक्षिका विद्यानिकेतन 4,
हडपसर पुणे 28.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!