June 30, 2025 4:49 pm

बारामती ते नागपूर : महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बड्डे एकाच दिवशी, कशी आहे दोघांची स्टाईल ?

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती ते नागपूर : महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बड्डे एकाच दिवशी, कशी आहे दोघांची स्टाईल ?

(निलेश गायकवाड)

राज्याचे सध्याचे सर्वात फेमस दोन राजकारण्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. होय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाही उद्या दि.22 जुलै रोजी वाढदिवस . दोन्ही नेते राज्याच्या राजकारणातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. दोघांचाही प्रशासनावर मजबूत पकड आहे. दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याचा स्वभाव, काम करण्याची शैली आणि राजकीय कारकीर्दीतल्या काही साम्यांबद्दल…

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ही दोन्ही महाराष्ट्राच्या राजकारणतली दिग्गज नावं आहेत. गेली अनेक वर्षे विरोधी विचारसरणीचे राजकारण करत असूनही यांच्यात काही साम्य मात्र नक्की आहेत आणि यातलं महत्त्वाचं आणि चर्चेतलं साम्य म्हणजे पहाटेचा शपथविधी. २०१९ साली संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी राज्यपालांच्या साक्षीनं हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केलं. मात्र अजितदादांचं हे छोटंसं बंड फार काळ टिकू शकलं नाही आणि ८२ तासांतच हे सरकार कोसळलं. सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्रिपदी राहिल्याचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नोंदवला गेला.

मात्र पुढच्या अडीच तीन वर्षात राजकीय पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि अजित पवार फडणविसांच्या आग्रहाखातर परत बंडकर्ते झाले. सध्याच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री आहेत.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दोघांचीही राजकीय पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी आहे. अजित पवार ग्रामीण भागातले, शरद पवारांच्या मुशीत घडलेले तर देवेंद्र फडणवीस शहरी भागातले आणि संघाच्या मुशीत घडलेले. याची छाप या दोघांच्या भाषणाच्या शैलीवरही पडलेली दिसते. अजित पवारांचा लहेजा काहीसा ग्रामीण आहे. रांगडे शब्द, रांगडी भाषा, गावातल्या पारावरच्या नागरिकाचंही लक्ष वेधून घेणारा. तर देवेंद्र फडणवीसांची भाषा शैली, संयत आणि संयमित. प्रत्येक शब्द तोलून मापून बोलणं. त्याच्या शैलीचा चाहता असलेला वर्गही शहरी भागातला.

दोघांच्या कामाच्या शैलीत मात्र काहीसं साम्य दिसून येतं. अजित पवारांच्या वक्तशीरपणाची चर्चा राज्याला काही नवी नाही. पहाटेच्या शपथविधीच नव्हे तर विकासकामंही पहाटे करणं, अगदी घडाळ्याच्या ठोक्यावर काम करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे भल्या भल्या अधिकाऱ्यांची झोप उडाली होती. तर देवेंद्र फडणवीस चलाख, प्रशासनावर घट्ट पकड असणारे आणि प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करुन मगच त्यावर भाष्य करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकीय डावपेचांची उदाहरणं आपण विधानपरिषद, लोकसभा निवडणुकांमध्ये पाहिलीच आणि गेल्या जवळपास महिन्याभरापासून ते ठळकपणे दिसून येतच आहे.

त्यांचे शालेय शिक्षण…
देवेंद्र फडणवीस यांचे शालेय शिक्षण नागपूर मध्ये शंकर नगर चौक येथील सरस्वती विद्यालयातून पूर्ण केले. नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी पाच वर्षासाठी लॉ पदवीसाठी प्रवेश घेतला. १९९२ मध्ये त्यांनी लॉ पदवी मिळवली. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पद्वुत्तर शिक्षण घेतले. तसेच त्यांनी जर्मनीमध्ये डीएसई बर्लिन या संस्थेत डिप्लोमा इन मेथड्स एंड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा मिळवला. देवेंद्र फडणवीस हे १९९९ पासून ते आज सालापर्यंत विधिमंडळात आमदार आहेत. तसेच २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दहावीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण अहमदनगर जिल्यातील राहुरी तालुक्यातील देवकाळी प्रवरा या त्यांच्या आजोळी झाले. यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजित पवार यांना मुंबईत यावे लागले. मुंबईत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अजित पवार यांच्या वडिलांचे आकस्मित निधन झाल्यानंतर त्यांना शिक्षण सोडून पुन्हा बारामतीला यावे लागले. अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.

अजित पवार, देवेंद्र फडणवीस दोघांची कार्यशैली, भाषाशैली, सगळंजरी वेगवेगळं असलं तरी यांच्याबाबतीत सारखी असलेली गोष्ट म्हणजे या दोन्ही अभ्यासू नेत्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणात महत्त्वाचं स्थान मिळवलंय. या दोन्ही नेत्यांची राज्याच्या राजकारणातली ओळख पुसता न येण्यासारखी आहे. दोघांचाही चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!