June 30, 2025 8:29 am

ऐश्‍वर्या सुर्यपुजारीची मेट्रो पायलट पदी नियुक्ती (करमाळा युवा सेनेच्या वतीने सन्मान)

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी :- करमाळा तालुक्यातील व मौजे श्रीदेवीचा माळ येथील रहिवासी असलेले पद्माकर सुर्यपुजारी यांची कन्या ऐश्‍वर्या सुर्यपुजारी हिची पुणे येथे मेट्रो पायलट पदी नियुक्ती झाल्याने तिचा सन्मान करमाळा येथील युवा सेना मध्यवर्ती कार्यालय येथे वाकाव गावचे युवा सरपंच ऋतुराज शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी सावंत म्हणाले की, करमाळा तालुका हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये ऐश्वर्याने मेट्रो पायलट हे क्षेत्र निवडून करमाळा वासियांची मान आणखी अभिमानाने उंचावली आहे. तिच्या निवडीमुळे फक्त करमाळा तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्हयासाठी हा आनंदाचा क्षण आहे. ऐश्वर्याने यापुढे ही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत अशा शुभेच्छा यावेळी सावंत यांनी दिल्या.
यावेळी युवा सेना जिल्हा उपप्रमुख श्रीकांत गोसावी, जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, शिवसेना महिला तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड, भाजपा शहर अध्यक्ष जगदीश आग्रवाल, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, उपतालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, सुभाष पाटील, मनोज रोकडे, दादा थोरात, उप शहर प्रमुख रूपाली शिंदे, अनिकेत यादव, गणेश पवार, खंडू जगताप, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!