June 30, 2025 3:52 am

अमली पदार्थाच्या आहारी जाणारी तरुण पिढी व मोबाईल चे दुष्परीणाम ..

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमली पदार्थाच्या आहारी जाणारी तरुण पिढी व मोबाईल चे दुष्परीणाम ..
ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे शिष्य ह.भ.प. तानाजी पांडूळे महाराज यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यामंदिर दौंड व्याख्यान संपन्न.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
(8446119158)
दौंड – दौंड शहरातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यामंदिर दौंड येथे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे शिष्य ह.भ.प. तानाजी पांडूळे महाराज यांचे दि. 11 जुलै 2024 रोजी व्यसनमुक्ती या विषयामधील अमली पदार्थाच्या आहारी जाणारी आजची तरुण पिढी व मोबाईलचे दुष्परीणाम या विषयावरती अतिशय सुंदर व्याख्यान झाले.
यावेळी महाराजांनी आपल्या अभ्यासपुर्ण व्याख्यानामध्ये आजची पिढी व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्या तरुणांची त्याच बरोबर त्याच्या कुटुंबाचे होणारे नुकसान कशा पध्दतीने होते हे सहज सोप्या भाषेत अनेक मार्मिक उदाहरणांचे दाखले देत मुलांना पटवून दिले.
गुटखा, तंबाखू, दारु, सिगारेट यांचे आपल्या शरीरावरती किती भयानक परीणाम होतात व त्यामूळे संपूर्ण कुटुंब कशापध्दतीने उध्वस्त होते हे समाजावून सांगितले. आजचा तरुण उद्याच्या उज्ज्वल भारताचा कणा आहे आणि तोच कणा जर व्यसनाधिन होत असेल तर या तरुण पिढीला वेळीच व्यसनापासून दूर करणे काळाची गरज आहे. मोबाईलचा जेवढा उपयोग चांगला आहे त्याच्या कितीतरी पट त्याचे दुष्परीणाम आहे. हे साध्या साध्या उदाहरणांसह महाराजांनी मुलांना पटवून दिले.
हा कार्यक्रम घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती संघटना उपाध्यक्ष ह.भ.प. शिवाजीराजे काळे यांनी प्रयत्न केले त्यांचे शाळेचे मुख्याध्यापक अनिल धामणे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल धामणे, पर्यवेक्षक मच्छिंद्र नवले, व सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दादासाहेब काळे यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!