‘प्रताप’ च्या विद्यार्थ्यांची पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती
अमळनेर : विक्की जाधव.
प्रताप महाविद्यालयाचा टी वाय बीएस्सी(गणित) 2016 चा माजी विद्यार्थी लिंगायत रविंद्र मनोहर(मु.पोस्ट-पष्टाने,ता.धरणगाव) यांची नुकतीच जळगाव जिल्हा पदवीधर शिक्षक म्हणून शासनाने नियुक्ती केली आहे.रविंद्र लिंगायतने आपले पदव्युत्तर शिक्षण क.ब.चौ.उ.म.विद्यापीठ,जळगाव येथून पूर्ण केले आहे.या यशा बद्दल रविंद्र लिंगायत याचे प्राचार्य डॉ.अरुण जैन,खा.शि.मंडळाचे सहसचिव डॉ.धिरज वैष्णव,रेक्टर तथा उपप्राचार्य डॉ.अमित पाटील,उपप्राचार्य डॉ.विजय तुंटे, उपप्राचार्य डॉ.व्ही.बी.मांटे, उपप्राचार्य प्रा.पराग पाटील,उपप्राचार्य डॉ.कल्पना पाटील,उपप्राचार्य डॉ.योगेश तोरवणे, गणित विभाग प्रमुख डॉ.नलिनी पाटील,डॉ.हर्षवर्धन जाधव,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे,डॉ.आर.सी.सरवदे,प्रा.शशिकांत जोशी,कुलसचिव राकेश निळे,भटू चौधरी, कमलाकर पाटील,विजय ठाकरे,देवेंद्र कांबळे,अजय साटोटे,सी.सी.एम.सी चे दिलिप शिरसाठ,मेहूल ठाकरे,पराग पाटील आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.