November 22, 2024 2:39 am

सुरत येथील कुख्यात गुन्हेगारांना जळगांवातुन अटक १६ लाखांची घेतली होती सुपारी

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुरत येथील कुख्यात गुन्हेगारास जळगांवातुन अटक १६ लाखांची सुपारी घेवून दोन जणांचा गळा कापून खून केला होता खून..

 

१६ लाखांची सुपारी घेवून दोन जणांचा गळा कापून खून प्रकरणात फरार असलेल्या दोन कुविख्यात गुन्हेगारांना जळगाव शहरातील अजिंठा चौकातून जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दोघांनी खूनाची कबुली दिली असून त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे. अफजल अब्दुल शेख (वय ३८) रा. उमरपाडा, सुरत आणि प्रज्ञनेश दिलीप गामीत वय २६ रा. तरकुवा डुंगरी फलीया ता. व्यारा जि. तापी गुजरात असे अटक केलेल्या दोन्ही कुविख्यात गुन्हेगारांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतचे एमआयएमचे खुर्शीद अली सय्यद यांनी १६ लाख रुपयांची सुपारी देऊन अफजल अब्दुल शेख व प्रज्ञनेश दिलीप गामीत यांनी ८ जून रोजी सुरत येथील बिलाल चांदी व अज्जू या दोन जणांचा गळा कापून खून केला होता. तेव्हापासून हे दोघेजण फरार झाले होते. गुजरात पोलीसाचे ११ पथक त्यांच्या मागावर होते. हे दोन्ही कुविख्यात गुन्हेगार हे जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ अक्रम शेख यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर अंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन यांनी गुरुवारी २७ जून रोजी रात्री १० वाजता सापळा रचून दोघांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता १६ लाखांची सुपारी घेवून दोन जणांचा गळा चिरून हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलीसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता अफजल अब्दुल शेख हा सुपारी घेऊन ५ जणांचे खून केल्याचे गुन्हे दाखल आहे तर प्रज्ञेश गामीत याच्यावर विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. हे आरोपी सुरत येथील कोविख्यात गुन्हेगार असून त्यांच्या शोधासाठी गुजरात पोलिसांनी 11 पथके तयार केली होती. या दोघांना अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!