November 24, 2024 6:44 pm

पाळलेले जंगली डुकरांना कोंडून ठेवा असे सांगण्याचा राग आल्याने चौघानी केली मारहाण, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पाळलेले जंगली डुकरांना कोंडून ठेवा असे सांगण्याचा राग आल्याने चौघानी केली मारहाण, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू..

अमळनेर : विक्की जाधव..

पाळलेले जंगली डुकरांना कोंडून ठेवा असे सांगण्याचा राग आल्याने चौघानी मारहाण केल्याने एकाने स्वतःला पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची घटना २५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे घडली. याप्रकरणी चौघांवर अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन  अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील गणेश भाईदास घिसाडी व त्याचा भाऊ विलास भाईदास घिसाडी यांच्या घराच्या मागच्या बाजूला रामबाई भुरा वडर, विनोद भुरा वडर, प्रवीण भुरा वडर, सुदाम भुरा वडर हे लोक राहतात. त्यांची मोकाट जांगली डुकरे आजूबाजूच्या घरांमध्ये घुसतात म्हणून त्यांच्यात वाद होते. २५ रोजी सकाळी विलास बाहेर गेले असता दुपारी तीन वाजता विनोद वडर याच्या डुकरांनी पुन्हा घरात घुसून जीवनावशक वस्तुंची नासाडी केली म्हणून विलास बोलायला गेला असता विलासला चौघानी लाठ्या काठ्यांनी मारहाण केली.  चौघांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विलास याने स्वतः च्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्याला उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याने धुळे पोलिसांना चौघांविरुद्ध जबाब दिला होता . उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असुन. मयताच्या नातेवाईकांनी २६ रोजी विलास चे शव अमळनेर तहसील कार्यालया आवारात आणले होते तदनंन्तर नातेवाईक यांनी तीन तास तहसील कार्यलय बाहेर आंदोलन केले आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली असुन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी पोलीस अधिकऱ्यानां  गुन्हा दाखल करून चौकशी करण्याच्या सूचना दिल्यात.
गणेशच्या भाईदास घिसाडी यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन. पोलीस पुढील तपास करत आहेत.
सदर घटनेतील सर्व आरोपीनां पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!