June 30, 2025 3:34 am

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे प्रवेशोत्सव साजरा…

अपनी भाषा में पढ़े! Translate

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदुळवाडी येथे प्रवेशोत्सव साजरा…
प्रतिनिधी: – अजिनाथ कनिचे
माढा तालुक्यातील तांदुळवाडी येथे १५ जून रोजी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाहिलीतील मुलांचा प्रवेश मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रवेश उत्सवामध्ये सर्वप्रथम इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलांची ट्रॅक्टर- ट्रॉली मधून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व गुलाबाचे फुल देऊन टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच सर्व मुलांना मोतीचूर लाडू अशा गोड खाऊचे वाटप करण्यात आले.
तसेच 𝒜. 𝒯. 𝒮. परीक्षेत सोलापूर जिल्यात चौथा क्रमांक पटकवणारे विद्यार्थी कु.आनंदी महादेव गवळी, सुहास सोमनाथ जगताप यांचाही सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमाच्या निमित्ताने तांदुळवाडी गावचे उपसरपंच किरण गवळी, राजाभाऊ शिंदे, पोस्टमन ज्ञानेश्वर जाधव, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विष्णू अनपट, उपाध्यक्ष सुप्रिया भोसले, मुख्यद्यापक मनोहर वासकर सर,माऊली गवळी, अविनाश अनपट, जेस्ट नागरिक बाबुराव गोसावी तसेच इयत्ता पाहिलीचे पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभार सर यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!