November 24, 2024 8:21 pm

प्लॉटचा व्यवहारात एका तरुणाची १८ लाखात फसवणुक पोलिसांत गुन्हा दाखल..

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्लॉटचा व्यवहारात एका तरुणाची १८ लाखात फसवणुक पोलिसांत गुन्हा दाखल..

अमळनेर : विक्की जाधव

बखळ प्लॉटचा व्यवहार करण्यास न्यायालयाने नकार दिलेला असतांना देखील तो प्लॉट नावावर करुन देतो. असे म्हणत मुक्ताईनगरातील तरुणाची १८ लाखात फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दि. १२ जून रोजी संशयित चंद्रकांत सतीश तोशणीवाल (माहेश्वरी) रा. आदर्श नगर याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताई नगरातील गौरव रवींद्र पवार (वय ४०) हा तरुण वास्तव्यास असून तो खाजगी नोकरी करतो. गौरव यांची चंद्रकांत सतीश तोशणीवाल रा. आदर्श नगर, यांच्याशी दि. १ नोव्हेंबर २०२३ रोजी ओळख झाली. त्यावेळी गौरव पवार यांना बखळ प्लॉट विक्री करायचा असून तू खरेदी केल्यानंतर तो कोणालाही विक्री करुन देवून तुला चांगला नफा मिळवून देईल असे सांगितले. त्यानंतर चंद्रकांत तोशणीवाल याने गौरव पवार यांच्याकडून वेळोवेळी एकूण १८ लाख रुपये घेत तीन महिन्यात प्लॉटची खरेदी करुन देण्याबाबत सौदापावती करुन घेतली. परंतु तीन महिने उलटून देखील चंद्रकांत तोशणीवाल यांनी प्लॉट गौरवच्या नावावर खरेदी करुन दिला नाही.

गौरव पवार यांनी तगादा लावल्यानंतर तोशणीवाल हा वेळोवेळी मुदत मागून घेत असल्याने त्यांना त्यांच्या व्यवहाराविषयी शंका आली. त्यांनी त्या मिळकतीचा सातबारा उतारा काढला असता, त्यावर मनाई हुकूम असे नमूद केले होते. त्यावर सतिश माहेश्वरी याने खुलासा सादर करुन त्यावर युक्तीवाद होवून त्या मिळकतीचा व्यवहार करण्यास मनाई केल्याचे त्यांना समजले. बखळ प्लॉट विक्री करण्यास मनाईचे आदेश असतांना देखील चंद्रकांत सतिष तोशणीवाल उर्फ माहेश्वरी या ब्रोकरने गौरव पवार यांच्याकडून १८ लाख रुपये घेवून त्यांची फसवणुक केली. दरम्यान, गौरव पवार यांनी रामानंदनगर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार बुधवार दि. १२ जून रोजी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!