रशियातील वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्र किनाऱ्याजवळ फेरफटका मारत आईशी झालेला कॉल जियान साठी ठरला अखेरचा..
अमळनेर : विक्की जाधव.
रशिया येथे सद्या वैद्यकीय ( एम बी बी एस ) शिक्षण घेत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील दोन बहीण भाऊ वोल्खोव्ह नदीच्या किनारी शहराच्या समुद्र किनाऱ्याजवळ फेरफटका मारत असतांना अचानक वेगाने आलेल्या लाटेत त्यांचा त्यात बुडून मृत्यू झाला यात अमळनेर येथील जिशान अश्पाक पिंजारी आणि जिया फिरोज पिंजारी दोघेही रां. इस्लामपूरा अमळनेर तर भडगाव येथील हर्षल अनंतराव देसले अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघांपैकी हर्षल देसले या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून इतर विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेऊन रशिया येथील दुतावास यांच्याशी संपर्क करून माहिती जाणून घेतली. पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला असुन पुढील कार्यवाही चालू आहे.
रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. जिल्ह्यातील हे तिघे विद्यार्थी..
त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत रशियातील वोल्कोव्ह नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळ चौपाटीवर फिरत असतांना नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आई ला व्हिडीओ कॉल केला आणि आपली बहीण जिया कशी नदीतच्या पाण्यात उतरली आहे हे आनंदाने तो आपल्या आईला दाखवत होता. आई आई ने म्हटले ” बेटा पाणी मे मत जानां” हेच जिशान च्या आईचे अखेरचे झाले बोलणे, अन थोड्याच वेळात होतेच्या न होते झाले. पुढच्या महिन्यात मायदेशी येण्यासाठीचे देखील झाले होते बोलणे परंतु नियतीला हे मान्य न होते.
रशिया येथील प्रशासन आणि पोलीस यांच्यावतीने भारतीय दूतावासाला या घटनेबाबत कळविण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना माहिती कळवून मयत विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला आहे. चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूने जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. हर्षल देसले या विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्यासाठी रशियाची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.