तालुक्यातील मुगसे गावालगत खळवाडीत गेल्या दोन दिवसांपासून बिबटयांच्या.
अमळनेर : विक्की जाधव
हल्यात दोन ते तीन वासरांचा फरशा पडून मृत्यू झालेला आहे त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण असल्याने ग्रामस्थ नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मुगसे येथील भागवत यादव कोळी यांचे रहात्या घराच्या मागील बाजुस गुराचा गोठा खळे असून त्यांत गाय बैलजोडी वासरे असे असतात त्यांतून तीन ते चार वर्षाचे वासरांचा बिबट्यांने फडशा पाडला आहे. परिसरांत गंगापुरी येथ ही गेल्या दोन चार दिवसापूर्वी गावात जनावरांवर बिबटाने हल्ला करून फडशा पाडला होता. आता दोन दिवसापासून मुंगसे येथे बिबटयाने धुमाकुळ घातला आहे याविषयी
वनविभागा पारोळा यांना फोनवरून माहिती कळविण्यांत आली आहे. या बिबटयाचा बंदोबस्त करून पुढील होणारी जिवीत गुरांची हाणी थांबवावी अशी मागणी मुंगसे व परीसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. बिबटयाचा वावर असल्यांने गुरांचा फडशा पाडल्याने शेतात मजुर वर्ग ही भिती पोटी जात नसल्याने घबराट निर्माण झाली आहे.