खंडणी मागणे भोंवले पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल..
अमळनेर : विक्की जाधव.
अमळनेर पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्यावर खंडणी मागने भोंवले तर शाळेची वॉट्सअप च्या माध्यमातून बदनामी करणे आणि धमकी देने प्रकरणी यांच्यावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन
गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी तालुक्यातील एका शाळेबाबत बदनामीकारक मजकूर वॉट्सअप वर टाकला होता. या बाबत अमळनेर पंचायत समिती यांच्याकडे शाळेने अर्ज दाखल केला होता. त्याच्या नकली घेण्यासाठी उमेश पाटील हे पंचायत समिती अमळनेर येथे आले असता. त्यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनात जाऊन रावसाहेब पाटील यांना विनंती पूर्वक सांगितले कि आमच्या शाळेची बदनामी करू नका त्यावर रावसाहेब पाटील यांनी अर्वाच्च भाषेचा वापर करत २०१२ पासून तुमच्या शाळेला मिळालेल्या अनुदानातून मला पाच टक्के रक्कम तसेच RTE वर देखील पाच टक्के रक्कम संध्याकाळ पर्यंत मला आणून दे अन्यथा मान्यता रद्द करतो, या संधर्भात शाळेची बदनामी, शिवीगाळ, आणि धमकी दिल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे