अमळनेरकर पर्यावरण प्रेमी अनुभवणार महा- वृक्षारोपण कार्यक्रमात ऐका मिनिटात २२२२ रोप लावण्याचा विक्रम, मानव निर्मित जंगलाकडे कडे होणार वाटचाल.
अमळनेर : विक्की जाधव.
लवकरच पावसाळ्याच्या सुरूवातीला सर्व अमळनेर जनता यांच्या उपस्थितीत होणाऱ्या १ मिनिटात २२२२ महावृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन सर्वांच्या वेळा घेऊन करण्यात येणार आहे. यानिमित्त वन विभाग, जळगाव विभागाचे अधिकारी श्री. अंबरीष ऋषी महाराज टेकडीवर ऐका मिनिटात २२२२ रोप लावण्याच्या कार्यक्रमाचे नियोजाबाबत चर्चा व जागा पाहण्यासाठी आले होते. सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) श्री सुदर्शन शिसव, वनपरीक्षेत्र अधिकारी पारोळा (अ. का.) श्री अर्शद मुलानी, वनपाल अमळनेर श्री प्रेमचंद सोनवणे, वनरक्षक श्री जगदीश ठाकरे. सुप्रिया देवरे, टेकडी ग्रुप सदस्य हेमंत महाले, डॉ. राजेंद्र सोनार, डॉ.अनिल वाणी, डॉ. अपर्णा मुठे, टेकडी ग्रुप अध्यक्ष आशिष चौधरी, सर्व कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत श्री संदीपकुमार साळुंखे साहेब, IRS. वैयक्तिक लक्ष घालून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नागपूर येथून पहिल्या नियोजन बैठकीत उपस्थित होते.
या ही संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते,
महिला हाऊसिंग ट्रस्ट, अमळनेर. यांच्या कडून 2222 खड्डे करून दिले जातील. महाराष्ट्र मंडळ अबु धाबी, दुबई. संत सखाराम महाराज संस्थान, अमळनेर मंगळ ग्रह सेवा संस्था, अमळनेर. रोटरी क्लब, अमळनेर लायन्स क्लब, अमळनेर अमळनेर महिला मंच ट्रस्ट,अमळनेर. पतंजली योग समिती, अमळनेर. शिवशाही फाउंडेशन, अमळनेर. विजयनाना पाटील आर्मी स्कुल, अमळनेर. फोटोग्राफर संघटना,अमळनेर. पत्रकार संघटना,अमळनेर. मारवड विकास मंच पातोंडा विकास मंच दहीवद विकास मंच