अभ्यासात सातत्य व मेहनत करण्याची तयारी असेल तर स्पर्धा परीक्षातून यश निश्चित मिळते. DYSP नंदवाडकर..
अमळनेर : विक्की जाधव..
येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित पू. साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अमळनेर आयोजित दोन दिवशी करिअर मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अमळनेरचे डीवायएसपी सुनील नंदवाडकर,प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एस आर चौधरी, एम एम कॉलेज पाचोरा येथील प्राध्यापक डॉक्टर अतुल सूर्यवंशी, साने गुरुजी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. डीवायएसपी नंदवाडकर म्हणाले की अभ्यासात सातत्य व मेहनत करण्याची तयारी असेल तर स्पर्धा परीक्षातून यश निश्चित मिळते. संयम देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा जीव ओतून काम करा असा सल्लाही त्यांनी दिला. डॉ. एस आर चौधरी व डॉ. अतुल सूर्यवंशी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्नेहल सिसोदे, आदित्य पाटील, गायत्री पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले
स्पर्धा परीक्षा तयारी सोबत विद्यार्थ्यांमध्ये मानवी मूल्य रुजवावे त्यांचा सर्वांगीण विकास करावा त्यातून आदर्श नागरिक घडेल असे प्रतिपादन मंगळ ग्रह सेवा संस्था अंमळनेरचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी केले.
दोन दिवशी कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वन मिनिट शो स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.
नगरपरिषदेचे निवृत्त प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख, निवृत्त शिक्षक व्ही एन ब्राह्मणकर,श्रम साफल्य अभ्यासिका वेल्हाणेचे संचालक के एल पाटील, कळमसरे हायस्कूलचे उपशिक्षक सोपान भवरे ,तलाठी एम आर पाटील, पोलीस चंदन पाटील, विशाल सोनवणे, दानेश सोनार, मयूर पाटील, यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
लोकमान्य टिळक स्मारक समिती,पंकज कॉम्प्युटरचे संचालक राजेंद्र भावसार, निवृत्त लिपिक रवींद्र चव्हाण, माजी नगरसेवक राजू दादा फाफोरेकर, साने गुरुजी ग्रंथालयाचे संचालक दीपक वाल्हे,शिक्षक सतीश कांगणे, जाधव इंग्लिश अकॅडमी चे संचालक विनोद जाधव, शिक्षक प्रवीण पाटील, चंद्रकांत देसले, प्रेमराज पवार, शशिकांत पवार, आयटीआय इन्स्ट्रक्टर गणेश पाटील, पीडब्ल्यूडी चे असिस्टंट इंजिनियर युनूस पिंजारी, विनोद सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
श्रीमती सरला हरिभाऊ पाटील एलआयसी अधिकारी, विजय जगन्नाथ बोरसे निवृत्त स्टेट बँक अधिकारी,दिलीप राजाराम सोनवणे अध्यक्ष साने गुरुजी ग्रंथालय, प्रकाश रामदास वाघ चिटणीस साने गुरुजी ग्रंथालय सौ उज्वला व चंद्रकांत नगावकर या मान्यवरांच्या दातृत्वातून विविध स्पर्धांसाठी रोख बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आली. स्नेहल सिसोदे मेघा मोरे या विद्यार्थिनी सूत्रसंचलन केले तर केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष चिटणीस व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले.