अमळनेर पो. स्टे हद्दीतील मयत अनोळखी वृद्धाची ओळख पटवण्याचे अमळनेर पोलिसांचे आव्हान..
अमळनेर : प्रतिनिधी.
दिनांक ०६/०४/२०२४ रोजी रात्री १०:३० वाजेचे सुमारास इंग्लिश मीडियम स्कूल मंगरूळ अमळनेर समोर रोडवर अनोळखी पुरुष जातीचे वय अंदाजे ७० वर्ष नाव गाव माहित नाही बेशुद्ध अवस्थेत पडलेला मिळून आल्याने त्यास 108 अंबुलन्सने उपचाराकामी दि.०६/०४/२०२४ रोजी रात्री १२.१५ वा. हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे दाखल केले.
त्यानंतर सदर इसमावर उपचार चालू असताना दि.१०/०४/२०२४ रोजी पहाटे ०२.१५ वा. डॉक्टरांनी सदर इमस यास तपासून मयत घोषित केले आहे. सदर मयताचे वारसाची आज पावतो वाट पाहिली असता कोणीही वारसदार मिळून आले नाही. करिता वैद्यकीय अधिकारी यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन ००/२०२४ नंबर ने अकस्मात मृत्यूची नोंद करून आज रोजी अमळनेर पो. स्टे. कागदपत्र प्राप्त झाल्याने अमळनेर पो.स्टे. अकस्मात मृत्यू रजि. नंबर ००५१/२०२४ कलम १७४ दि.२३/०५/२०२४ प्रमाणे दाखल आहे
मयताचे वर्णन :-
एक पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे ७० वर्षे वयोगटातील रंगाने सावळा अंगात, पांढऱ्या रंगाचे फुल बाहींचे शर्ट व पांढऱ्या रंगाची फुल पॅन्ट, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, नाक वाकलेले, दात पडलेले, दाढी वाढलेली व केस पांढरे झालेले, डोक्याचे अर्धवट टक्कल पडलेले केस पांढरे, उजव्या हाताच्या कामेवर श्रीराम असे नाव गोंदलेले असे वर्णन आहे.
तरी सदर मयताच्या ओळखी बाबत कोणास काही माहिती मिळून आल्यास खालील क्रमांक वर संपर्क करावा
अमळनेर पोलीस स्टेशन :- ०२५८७ – २२३३३३
स फौ.२१६७ संजय पाटील, अमळनेर पोलीस स्टेशन
मो.न.७३७८४११९६९