अमळनेरला बारावी वर्गाच्या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा केला सन्मान!
अमळनेर -येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावी वर्गाचा कला शाखेचा निकाल 97.01 टक्के लागला. या पार्श्वभूमीवर “शाळा- आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत या गुणवंत “सावित्रीच्या लेकीं”चा आई- वडिलांसह घरी जाऊन सन्मान केला. गुणवंतांना पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा केला. ग्रामीण भागात अनोख्या पध्द्तीने झालेल्या या सन्मानाने पालक- विद्यार्थी सुखावले आहेत.
येथील सावित्रीबाई फुले उच्च माध्यमिक विद्यालयात रितु संजय पाटील (रा. खडके) व प्रतिक्षा शांताराम पाटील (रा. निसर्डी ) या दोघीनी 85 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तर अंजली निंबा पाटील (रा.बहादरवाडी) हिने 83 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गुणवंत विद्यार्थिनींचा ज्युनिअर विभाग प्रमुख सुनील पाटील, सुरेश पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उमेश काटे, किरण पाटील, कल्याण नेरकर, आर आर पाटील यांच्या सह पालक शांताराम पाटील, संजय पाटील, शिक्षक विनोद पाटील (निसर्डी ) निंबा पाटील आदी उपस्थित होते.उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान बारावीच्या परीक्षेला प्रविष्ट असलेल्या 67 विद्यार्थिनींपैकी 65 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. यात 9 विद्यार्थिनीं ह्या विशेष प्राविण्यासह तर 45 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शिलाताई पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी. पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा श्याम पवार, मानद शिक्षण संचालक प्रा.सुनील गरुड, प्राचार्य गायत्री भदाणे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.