जळगाव येथे काल दि ७ रोजी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेला अमळनेर तालुक्यातून जोरदार प्रतिसाद.
अमळनेर : विक्की जाधव.
काल सायंकाळी जळगाव जिल्हा लोकसभा मतदारसंघात आयोजित उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी अमळनेर उबाठा सेना तथा महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पवार यांचा तालुक्यातुन असंख्य गाड्यांचा ताफा काल दुपारी जळगावकडे प्रचारार्थ निघाला यावेळी अमळनेर तालुक्यात महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष प्रचारात सक्रिय झाले होते. असे असताना येथून एकत्रितपणे जळगाव कडे पक्ष एकसंघ झाले असून शिवसेचा काल जळगाव येथे झालेल्या उद्धव ठाकरे यांचा सभेचा चांगलाचं इम्पॅक्ट जळगांव लोकसभा मतदारसंघावर झालेला दिसून येत आहे.
ठाकरे गट तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी सह यांची सभा असल्याने शहरात अनेक महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड परिश्रम घेत विविध भागातून तसेच ग्रामीण भागातून उमेदवार करण पवार यांच्या साठी जळगांव येथे जमलेले दिसलें.
असे असताना करण बाळासाहेब पवार यांना जनतेची चांगलीच पसंती दिसून येत आहे.