दोंडाईच्यात उन्हाच्या तडाख्यात नवरदेव व नवरदेवाचे लग्नही सापडले….
४२ अंश सेल्सिअस तापमानात डिजेच्यासोबत नवरदेव एकटा रोडावर-घोड्यावर व वराती पोहचले बोहल्यावर….
दोंडाईचा- सध्या दोंडाईचा शहरात उन्हाचा तडाखा चांगलाच, भल्याभल्यांना भेडसावत आहे.त्यात लग्न सराईचे तिथी-दिवस असल्याने, पहिलेच कमी-थोडे लग्न तिथी असुन आणि वरून सुर्य देवताने उन्हाचा ४२ अंश सेल्सिअस तापमानाचा आकडा पार केला असल्याने, ह्या कडक उन्हाळ्यात लग्न सोहळा ठेवावा कसा व लग्न सोहळा न ठेवल्यास उपवर मुलामुलींचे वर्ष हे पुढे ढकलेले जाईल व सर्व गोष्टी भविष्यात तर्क लावल्यासारखी होतील. ह्या विवंचनेतुन विवाह इच्छुक मुला-मुलीकडील पालक असुन, दुसरीकडे ऐवढ्या कडक उन्हात जायचे का टाळून द्यायचे, ह्या द्विधा मनःस्थितीत लग्न सोहळा उपस्थिती दाखविणाऱ्या सगेसोयरे मित्रपरिवार आप्तस्वकीय, नातेवाईक यांची मनस्थिती झाली आहे.म्हणून अनेकवेळा चांगल्या उपवर मुला-मुलीनां योग्य-समान-मनासारखे स्थळ मिळत नाही आणि जर मिळत असेल तर लोक कशाला उन्हातान्हाची-सुर्य देवताच्या प्रकोपाची काय चिंता करतील.म्हणुन दोंडाईचा शहरात आज उन्हाचा तडाखा-सुर्य देवताचा पारा ४१/४२ अंश सेल्सिअस जरी जात असला,नवरदेवासोबत वऱ्हाडी मंडळी असोत-नसोत तरी लोक आपल्या मुला-मुलींचे लग्न सोहळा लावून मोकळा होत असतानाचे चित्र तरी गावात दिसत आहे.