June 30, 2025 12:17 pm

बस स्थानक परिसरात चोरीचे सत्र थांबेना.. जागा सांभाळण्यासाठी ठेवलेली बॅग चोरट्याने लांबवली.

अपनी भाषा में पढ़े! Translate

बसमध्ये जागासां भाळण्यासाठी ठेवलेली बॅगेसह त्यातील सुमारे १ लाखाचा ऐवज अज्ञातचो रट्याने लांबवल्याची घटना ७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिरपूर बस मध्ये घडली.

अमळनेर : विक्की जाधव

रायगड जिल्ह्यातील कोलाड गावातील सोनाली अनिल तिरमाळे (हल्ली मुक्काम वर्धमान नगर, अमळनेर) ही महिला ७ रोजी सकाळी (वाडी ता शिरपूर) येथे जाण्यासाठी

बसस्थानकवर आली असता शिरपूर बस लागली तेव्हा तिचा जेठ स्वप्नील याने जागा सांभाळण्यासाठी तिची बॅग चालकांच्या मागच्या सीटवर ठेवली. बॅगमध्ये एक लाख

सहा हजार ५०० रुपयांचे चार तोळे सोन्याचे दागिने, रोख

रक्कम आणि मोबाईल होता.वाहक तिकीट काढण्यासाठी

आल्यावर महिला बॅग घ्यायला चालकांच्या मागच्या सीटवर

गेली असता बॅग चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. बॅग मधील ७५ हजार रुपये किमतीची तीन तोळ्यांची सोन्याची पोत, १२ हजार ५००रुपयांचे सोन्याची कर्णफुले,१२ हजार ५०० रुपयांचे मंगळसूत्र, १५०० रुपये रोख आणि ५ हजार रुपये किमतीचे

दोन मोबाईल असा ऐवज चोरीस गेला होता. महिला परत

अमळनेर आल्यावर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून

तपास हेकॉ. संतोष पवार करीत आहेत.

 

 

 

 

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!