इगतपुरी चोपडा बसमधून दोन महिलांच्या हातातील ५४ ग्राम वजनाच्या सुमरे दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याच्या दोन पाटल्या चोरट्यानी चोरून नेल्याची घटना २ रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर: प्रतिनिधी.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील वर्डी येथील भारती राजेंद्र धनगर या २ रोजी इगतपुरी चोपडा बसमधून जात असताना कंडक्टर तिकिटाचा तपास करत असताना तिला लक्षात आले की हातातील २४ ग्रामची ६२ हजाराची सोन्याची पाटली चोरट्याने चोरून नेली आहे. महिला घरी निघून गेली. नंतर महिला अमळनेर बसस्टँड वर चौकशी करायला आली असता लासुर ता चोपडा येथील महिला पुष्पा अरुण देसले हिच्या हातातील ३० ग्रामची ९० हजार रुपयांची सोन्याची पाटली देखील चोरीस गेली असल्याचे सांगितले. भारती धनगर हिने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.