June 29, 2025 12:43 pm

झोपडीत जाऊन रामनवमी साजरी करत काजलच्या जीवनात फुलविला आनंद

अपनी भाषा में पढ़े! Translate

झोपडीत जाऊन रामनवमी साजरी करत काजलच्या जीवनात फुलविला आनंद

रामनवमी कृतीतून साजरी करत काजलच्या लग्नाला १० हजार रुपयांची मदत..

चला गाडगे बाबांचे विचार जपूया गरीब मुलींच्या लग्नाला मदत करूया हा उपक्रम राबवित कर्मयोगी ग्रामीण भागात गल्लोगल्ली आपली मदतीची व प्रेमाची वारी घेऊन जात आहे. ही वारी रामनवमीच्या दिवशी वडिलांचे छत्र हरवलेल्या मांगली ता. हिंगणा जिल्हा नागपूर या गावातील कु. काजल नागोराव चिखराम ताईंच्या झोपडीत जाऊन पोहोचली.
येत्या २८ एप्रिल २०२४ ला काजल ताईचे लग्न होत आहे. ती जीवनाच्या नवीन प्रवासाला सुरवात करणार आहे. आठ महिन्याची असताना नियतीने काजलच्या डोळ्यात असे अंजन घातले की बाबांचे दर्शन पुन्हा होऊच दिले नाही. नियतीने वडिलांना काळाच्या पडदयाआड करून शितल व काजल या बहिणींना पोरके करून सोडले. काजलच्या आई कुंदा
ताईचे जिवन सुद्धा सुरवातीपासूनचं गारीबीतचं गेले आपले दोनाचे चार हात’ झाले, की सगळ्या चिंता मिटतिल असं त्यांना वाटायचं पण हा एक समजचं ठरला, आयुष्यातील दुःखाचे खरे सूर तर इथूनच झिरपायला लागले…
लग्नानंतर नागोराव यांना क्षयरोगाने ग्रासले व कुंदाताईचे सौभाग्य लग्नाच्या फक्त ५ वर्षातंच काळाच्या पडद्याआड गेले, सासर अडेगाव येथे आधार न मिळाल्याने आपले विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर घेऊन त्यांनी आपले महेर मांगली गाठले. उघड्यावर आपला अर्धवट संसार मांडत कुंदाताई यांनी प्रचंड संघर्ष करत जगल्या त्या फक्त आपल्या मुलींसाठी, रोजमजुरी करत मुलींचा सांभाळ करणे सुरु केले. त्या काळात शितल व काजल या जित्याजागत्या महालक्ष्मीनी आई सोबत शेतमजूरी करत आपले शिक्षण सुरू ठेवले. उघड्यावरचे रहाणे आत्ता कुडामातीच्या घरात गेले, याच काळात मोठी बहीण शितलचे लग्न झाले. परंतु परिस्थिती अभावी काजलला बारावी नंतर शिक्षण सुद्धा थांबवावे लागले. काजल यावर्षी २२ वर्षाची झाली व आईला काळजी लागली ती काजलच्या लग्नाची ती त्यासाठी ईश्वराला प्रार्थना करू लागली. ताईंच्या प्रार्थनेला यश आले व काजलचे लग्न जुळून आले, परंतु परिस्थिती इतकी हालाकीची, की पत्रिका छापण्याकरिता सुद्धा पैसे नाहीत चुलत भावाने त्याच्या लग्नपत्रिके सोबतच दोघांची एकत्र पत्रिका छापून माणुसकीचे दर्शन दिले.
या सर्व गोष्टीची जाणीव ठेवत व कुंदा ताईंचा जीवघेणा संघर्ष पहात कर्मयोगीने काजलचे भावी आयुष्य आनंदात जावे व तिच्या लग्नाचा तिला आनंद घेता यावा यासाठी मर्यादा पुरूषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जयंतीला १० हजार रुपयांची मदत करत तिला साडीचोळी देऊन कृतीतून रामनवमी साजरी केली.
यावेळी भावना व्यक्त करताना काजल म्हणाली की मी आठ महिन्याची असताना बाबा गेले, त्यांनतर आईने आमच्यासाठी इतके कष्ट घेतले की तिच्या वेदना तीच जाणू शकते. ताईंच्या व आता माझ्या लग्नानंतर तिची कोण काळजी घेईल याची मला काळजी लागली आहे. आमच्या घरी आजपर्यंत कोणीचं मदत घेऊन आले नाही, कर्मयोगीने जी आम्हाला गरज असतांना मदत केली त्याबद्दल धन्यवाद मानत आपल्या अश्रूंना मोकळे करून दिले..
यावेळी गावकरी मंडळी व कर्मयोगी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!