वकवाड ग्रामपंचायत अंतर्गत गावातील सामाजिक कार्यासाठी प्रधान भवनासाठी पंधरा हजार स्केअर फुट जागेवर गावातील एका व्यक्तीने अनधिकृत पणे चर्चचे बांधकाम करून त्याच बाजूला दुसरे बांधकाम सुरू…
वकवाड हे शंभर टक्के आदिवासी गाव असून देखील गावात ख्रिश्चन लोकांचे चर्च बांधकाम करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करून मागील…
वकवाड ग्रामपंचायत अंतर्गत गावातील सामाजिक कार्यासाठी प्रधान भवनासाठी पंधरा हजार स्केअर फुट जागा राखीव ठेवण्यात आली होती. त्या जागेवर गावातील एका व्यक्तीने अनधिकृत पणे चर्चचे बांधकाम करून त्याच बाजूला दुसरे बांधकाम सुरू केल्यामुळे गावातील नागरिकांनी विरोध दर्शवन सदरचे बांधकाम बंद करून चर्च व सुरू केलेले बांधकाम नष्ट करून प्रधान भवनाची सार्वजनिक कामासाठी वापर व्हावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे वकवाड हे शंभर टक्के आदिवासी गाव असून देखील गावात ख्रिश्चन लोकांचे चर्च बांधकाम करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करून या मागील षळयंत्राच्या शोध लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वकवाड ग्रामपंचायत अंतर्गत गाव नमुना नंबर आठ नुसार रजिस्टर नंबर ३६७, मालमत्ता क्रमांक ३६८, मुळ मालकाचे नांव प्रधान भवन असून लांबी फूट १५०, रुंदी फुट १०० अशी एकूण पंधरा हजार स्केअर फुट जागा ग्रामपंचायतीने प्रधानभवनाच्या नावी केलेली होती. ह्या जागेवर आदिवासी बांधवांसाठी आपली रूढी -परंपरा, लोकप्रिय संस्कृती जतन करण्यासाठी नियोजित जागा प्रधान भवनाच्या नांवे करण्यात आली होती. या जागेवर गावातील एका व्यक्तीने अतिक्रमण करून अनधिकृतपणे चर्चचे बांधकाम केले. गावात एकही ख्रिश्चन व्यक्ती नसताना चर्चचे बांधकाम केले आहे. गावातील समाजा-समाजात तिढा निर्माण होऊन नये म्हणून हे अतिक्रमण केलेले बांधकाम नष्ट करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच प्रधान भवनाच्या जागेवर जाऊन सुरू असलेल्या बांधकामांचे निषेध करण्यात आला.
या प्रधान भवनाच्या आवारातील जागेवर ग्रामपंचायतीने अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मंजुरी मिळवून निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून अंगणवाडीचे बांधकाम सुरू करून पिलिंग (पायापर्यंत) पर्यंतच्या काम त्या व्यक्तीने बंद करून स्वतः ने त्यांवर अनधिकृतपणे बांधकाम सुरू केले. आता ते काम स्लॅब लेवल पर्यंत आले आहे. तरीदेखील यावर ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करत नाही. म्हणून गावातील लोकांनी निवेदनाद्वारे काम बंद करण्याची मागणी करून संबंधित व्यक्तीवर शासकीय जागा बळकवण्याच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
वकवाड हे गाव शंभर टक्के आदिवासी गाव आहे. या ठिकाणी एकही ख्रिश्चन धर्माचा व्यक्ती राहत नसून या ठिकाणी ग्रामपंचायतीने आदिवासी बांधवांसाठी विविध उत्सव रुडी- परंपरा व संस्कृतीची जतन व्हावी म्हणून प्रधान भवन बांधण्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आली होती. ह्या जागेवर गावातील एका व्यक्तीने अतिक्रमण करून सुरुवातीला चर्च चे बांधकाम केले व नंतर चर्च बाजूला नवीन वास्तू उभारण्यास सुरुवात केली त्यावेळी गावातील लोकांच्या लक्षात येत अस त्यांनी या विरोध दर्शन वकवाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना निवेदन देऊन सदर बांधकाम थांबवून ते पाडून जागा रिकामी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
वकवाड येथील प्रधान भवनाच्या जागेवरील अनधिकृत पणे अतिक्रमण करून चर्चचे बांधकाम व त्याच बाजूला दुसरे बांधकाम सुरू केले असून ते बांधकाम बंद करून नष्ट करण्याची मागणी खजान पावरा उपसरपंच, सिताराम मांला पावरा,मदन पावरा, सिताराम लकडया पावरा, ग्रामपंचायत सदस्य रुमा पावरा, लक्ष्मण पावरा,भारला पावरा, साहेबराव पावरा,भाऊ पावरा,निखासीबाई पावरा, हिरालाल पावरा,मगन पावरा, दिलदार पावरा,विजय पावरा, गोविंद पावरा, गणेश पावरा, श्रीमती शांताबाई पावरा, संतोष पावरा,किरण पावरा, विशाल पावरा,खेनसिंग पावरा, दिनेश पावरा, तुषार पावरा,सागर पावरा, मिलिंद पावरा,आकाश पावरा यांच्या सह गावातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी केलेले निवेदन वकवाड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना देण्यात आले आहे.