बोराडी ता.शिरपूर बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालय व लिलाई हॉस्पिटल बोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने किसान विद्या प्रसारक संस्थेच्या विश्वस्त स्वर्गीय लीलाताई रंधे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. हया रक्तदान शिबिरात ६१ रक्तदातांनी रक्तदान केले.
या प्रसंगी किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे,धुळे नंदुरबार बँकेच्या संचालिका सिमाताई रंधे,कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन शशांक रंधे,किसान विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त शामकांत पाटील, सरपंच सुकदेव मालचे, पतसंस्थेचे संचालक रवींद्र शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र पाटील,वासुदेव सत्तेसा, मुकेश जाधव,संदीप चौधरी, श्रीकांत बोरसे,बंटी सत्तेसा, गौतम सत्तेसा, प्राचार्य राजेश गिरी, डॉ.राहुल कांबळे, डॉ.नरेद्र मुंडे, डॉ. प्रशिक वाघ, इंडियन कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा वैद्य, शिरपूर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य महेश पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप पाटील ,डॉ.जया जाने, रोग निदान विभाग प्रमुख डॉ. गणेश कोल्हे , अंकुश पाटील, डॉ.गौरव बडगुजर, शेखर पाटील, उद्धव पवार ,आदी उपस्थित होते.
बोराडी येथील कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर आयुर्वेदिक महाविद्यालय , लिलाई हॉस्पिटल बोराडी व स्व.मुकेशभाई पटेल ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने किसान विद्या प्रसारक संस्थेच्या विश्वस्त स्वर्गीय लीलाताई रंधे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या प्रसंगी ६१ युवकांनी रक्तदान केले. यात विशेष म्हणजे महिला वर्गाने मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यासाठी सहभागी झाल्या होत्या.