श्री रंगनाथ बाबा पुण्यस्मरनोत्सव निमित्त संगीतमय शिव महापुराण कथा सोहळा संपन्न.
सिर्सी:- परमहंस श्री संत रंगनाथ बाबा पुण्यस्मरण उत्सव प्रसंगी सिर्सी येथे भव्य संगीतमय श्री शिव महापुरान कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला होता.
श्री शिव पुराण कथा सोहळा दिनांक ३० मार्च ला प्रारंभ करत ०६ एप्रिल ला सांगता आली.
श्री काशी महापुरान कथा प्रवक्ते श्री. ह.भ.प. गुरुवर्य पुंडलिक महाराज बोळवटकर ( अध्यक्ष :- ज्ञानराज माऊली कृपा प्रासादिक संस्था, श्री क्षेत्र पंढरपूर) यांचा प्रमुख उपस्थितीत व महेश महाराज चौधरी, अजय महाराज देहने, चंद्रकांत महाराज डहाके, नरहरी महाराज बोळवटकर, रुपदेव महाराज धोटे, श्रीहरी महाराज घरत, सोपान महाराज काळबांडे. आळंदी (दे ) यांच्या सहकार्याने घटस्तापना, अभिषेक, काकड भजन, ज्ञानेश्र्वरी पारायण, शिवमहापुरान कथा, हरपाठ, ज्ञान नामसंकीर्तन इत्यादी अनुष्ठान पार पाडले. श्री रंगनाथ बाबा यांची पादुका दर्शनासाठी पादुका दर्शन पालखी व भव्य शोभायात्रा ०५ एप्रिल ला गावातील मुख्य रस्त्यावरून भक्तिमय वातावरणात पार पडून रंगनाथ बाबा संस्थान येथे पालखी समाप्ती करण्यात आली.०६ एप्रिल ला काल्याचे कीर्तन करून आलुभात व जिलेबी चा अल्पहार वाटप करत. संगीतमय श्री शिव महापुरान कथा सोहळ्याची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी मनोहर गारघाटे, पुंडलिक कामडी , नंदू पडोळे, गजानन येवले, छोटू मुंजे, संदीप डेकाटे, दिलीप डाखोळे, ई. सर्वपरी सहकार्य करत संपूर्ण सोहळा आनंदात सांगता करण्यात आली.