June 29, 2025 4:27 am

रमजान ईद निमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा पोलीस स्टेशन येथे आज रमजान ईद निमित्त शांतता कमिटीची बैठक पोलीस उपनिरीक्षक पोपट टिळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी प्रा, कलीम काझी, माजी नगरसेवक शौकत नालबंद, करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीर तांबोळी, नगरसेवक अहमद कुरेशी,जामा मस्जिद चे विश्वस्त जमीर सय्यद राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आझाद शेख मुस्तकीन पठाण जामा मस्जिद चे विश्वस्त हाजी उस्मान सय्यद सामाजिक कार्यकर्ते सुरज शेख, नासीर कबीर हाजी महंमद अली शेख,आलीम शेख, अशपाक सय्यद,अफरोज पठाण,इंदाज वस्ताद, साजीद बेग आदी जण उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक टिळेकर म्हणाले की रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान व शहरातील सर्व मशीदीमध्ये सामुदायिक नमाजपठण करण्यात येत असून करमाळ्यात हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन रमजान ईद साजरी करण्याची परंपरा आहे आणि सर्वांनी मिळून ईद शांततेत व सलोखा कायम ठेऊन साजरी करण्याचे आवाहन टिळेकर यांनी केले आहे.
रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान,संगम चौक,फुलसौदर चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होत असुन ईद दिवशी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी गोपनीय चे गणेश दळवी यांनी आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!