June 30, 2025 5:25 am

युवा सेनेच्या करमाळा उपशहर प्रमुख पदी अनिकेत यादव यांची नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा युवा सेनेच्या उपशहर प्रमुख पदी अनिकेत यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर नियुक्ती पत्र शिवसेनेचे शहर प्रमुख नागेश काळे व युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर नियुक्ती नंतर यादव म्हणाले की, हिंदुरूदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण व २०% राजकारण या तत्त्वानुसार काम करणार असून शिवसेनेचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली व शहरप्रमुख नागेश काळे, युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना वाढीसाठी तन, मन धनाने कार्य करणार असल्याचे त्यानी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!