June 29, 2025 3:16 am

बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी उपाध्यक्षपदी प्रणव तावरे…

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी उपाध्यक्षपदी प्रणव तावरे…
बारामती ( सह-संपादक- संदिप आढाव)
बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी उपाध्यक्षपदी माळेगाव येथील प्रणव चंद्रकांत तावरे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रणव तावरे यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे ही निवड करण्यात आली असल्याची माहिती बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.
प्रणव तावरे यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षण घेतले असून विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे अग्रेसर असतात. कोविड काळात माळेगाव कोविड सेंटरमध्ये मोठे बंधू माजी सरपंच दिपक तावरे यांच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची मदत करण्यास प्रणव तावरे यांचा मोलाचा वाटा होता. त्यांना बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.यावेळी बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी सभापती संजय भोसले, कार्याध्यक्ष धनवान वदक, बारामती चे माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तात्रय येळे, रणजित तावरे, तुषार कोकरे इत्यादि उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!