आगामी उत्सव आणि लोकसभेच्या पार्श्वभूमी बघता शहरात डीवायएसपी सुनील नंदवाळकर साहेब यांच्या मार्गदर्शना खाली विविध भागातून रूटमार्च
अमळनेर : विक्की जाधव..
अमळनेर आगामी लोकसभा निवडणूक आणि
रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागातून पोलीस प्रशासनातर्फे रूट मार्च काढण्यात आला. सामान्य नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक बसावा म्हणून शहरातील संवेदनशील भागातून रूट मार्च काढण्यात आला.
डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली मारवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साळवे, पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, उपनिरीक्षक नामदेव बोरकर, उपनिरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक वसावे, बीएसएफ चे अधिकारी व कर्मचारी असे ८ अधिकारी, ५० पोलीस कर्मचारी, ३० होमगार्ड व ३० बीएसएफ जवान ह्या रूटमार्च लां सहभागी झाले होते.
गांधलीपुरा पोलीस चौकी,पाचकंदील चौक, शेतकीसंघ, गांधलीपुरा कॉलनी, मेहतर कॉलनी, गरीब नवाज चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, वाडी चौक, कसाली डीपी, माळीवाडा, झामी चौक ब्रहे गल्ली, पानखिडकी, सराफ बाजार पाच पावली येथे येऊन समारोप झाला.