दौंड मध्ये सर्व धर्मीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न.
मुला-मुलींचे लग्न जमवणे ही गंभीर समस्या याला पर्याय म्हणून वधू वर मेळावे घेणे आवश्यक.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – सम्यक प्रज्ञा फाउंडेशन संचलित सम्यक वधू वर सुचक केंद्र दौंड यांच्या विद्यमाने कालकथित सुनंदा साहेबराव पोळ यांच्या स्मरणार्थ दौंड येथे सर्व धर्मीय वधू वर परिचय मेळावा रविवार दिनांक 13/03/2024 रोजी गणेश हॉल दौंड रेल्वे स्टेशन जवळ घेण्यात आला या मेळाव्यासाठी पांडुरंग शेलार मा. कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला शेलार यांनी आपल्या मनोगत व्यक्त सांगितले की मुला मुलींचे लग्न जमवणे ही गंभीर समस्या निर्माण झाली असून त्याला पर्याय म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये वधू वर मेळावे घेणे आवश्यक असून आज जो मेळावा घेण्यात आला त्याला उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका एडवोकेट विजया अंगत शिंदे यांनी अनेक सामाजिक समस्येवर व त्यावरील उपाय योजना वर आपले विचार मांडले उपस्थित मान्यवर रवींद्र जाधव अभियंता जलसंपदा विभाग एडवोकेट अक्षय कुमार शितोळे मा. अनिल साळवे नगरसेवक यांनीही मनोगतातून फाउंडेशनला शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगद शिंदे यांनी केले कार्यक्रम मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रकाश लोणकर ,किरण जाधव, मा. रवी पवार यांनी आपल्या अलंकारिक व सुमधुरवाणीने पालकांच्या व वधू-वरांचा मनाचा ठाव घेतला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चला बौद्ध विहार जुळवूया ग्रुपचे मुख्य समन्वयक संचालक अंगद शिंदे यांनी आपले महत्त्वाचे योगदान दिले किरण जाधव, दिलीप पगारे, प्रभाकर बोरावडे ,जगदीश सिद्धगणे, अरविंद पगारे ,प्रभाकर कोरे, जयश्री माने, शिल्पा शेदगने ,सूर्यकांत चंदनशिवे, प्रमिला कातरवडे, तेजस चंदनशिवे, अंजली चंदनशिवे, राम मैराळ, कुणाल कुमार पोळ, अविष्कार पोळ, किसन सावंत ,गायकवाड, अभिषेक वाघमारे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जास्त परिश्रम घेतल्याचे सांगितले तसेच ज्ञात अज्ञात सर्व व्यक्तींनी दिलेल्या परिश्रमास फाऊंडेशन कडुन त्रिवार मानाचा जय भिम व आभार मानले .
कार्यक्रमासाठी अंदाजे २०० च्या आसपास सर्व धर्मातील मुले मुले व त्यांचे पालक उपस्थित होते सम्यक प्रज्ञा फाउंडेशनचे संचालित सम्यक वधू वर केंद्र व संस्थापक अध्यक्ष साहेबराव पोळ यांनी सर्वांचे आभार मानले.