भिगवण येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी…
पुणे (सह – संपादक – संदिप आढाव)
भिगवण, ता. इंदापूर येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये
स्वच्छतेचे जनक संत श्री गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच दीपिका तुषार क्षीरसागर यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पराग जाधव, जावेद शेख, संजय देहाडे, दत्ता धवडे, अमित वाघ, तानाजी वायसे, अमोल शिंदे आणि ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दरम्यान भिगवण येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा समाज मंदिरामध्ये परीट समाज बांधवांच्या वतीने जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भिगवण येथील समस्त भजनीमंडळांच्या वतीने आयोजित सकाळी 9 ते 12 पर्यंत भजनाचा कार्यक्रम होऊन समाज बांधवांच्या वतीने गाडगेबाबांची पूजा व आरती करण्यात आली. व यावेळी फराळ वाटप करण्यात आले…
यावेळी भारत कदम, गणेश राक्षे, नवनाथ कदम, राहुल कदम, सुदाम गायकवाड, अरुण नवले, राजेश शिंदे, आबा शिंदे, सुनिल शिंदे, साई राक्षे, राजेंद्र राक्षे, प्रशांत शेलार, बापू थोरात, अजिंक्य माडगे, सचिन बोगावत, प्रदीप वाकसे, अनिल कालंगे इत्यादी उपस्थित होते…