July 1, 2025 6:46 am

वडिलांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करत गावपुढे ठेवला एक आदर्श दृष्टिकोन…

अपनी भाषा में पढ़े! Translate

वडिलांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करत गावपुढे ठेवला एक आदर्श दृष्टिकोन…
लाखांदूर पासून हाकेच्या अंतरावर असणारे चिंचोली अंतरगाव येथील अत्यंत, प्रतिकुल, गरीब परिस्थितीतुन शिक्षण घेऊन समोर आलेले कर्मयोगी फाऊंडेशनचे मार्गदर्शक व शासकीय सेवेत पंचायत समिती,लाखांदूर येथे ग्रामसेवक पदावर असणारे तुलसीदास भानारकर यांनी आपल्या वडिलांनी त्यांना मोठं करण्यासाठी जे अपार कष्ट घेतले त्या कष्टाची जाणीव ठेवत व आपल्या गावप्रती कृतज्ञता जपत आपल्या जन्मगावी चिंतामणजी भानारकर वडिलांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करताना गावांत नेत्र तपासणी शिबिर राबवून गावातील वृद्ध मंडळीना निशुल्क चष्मे वाटप व त्यांना म्हातारपणात आधार देण्यासाठी आधार काठीचे (कुबडी) वाटप केले. गावात मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली. इतकेच नव्हे तर कर्मयोगी फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यासाठी चारचाकी गाडीचे लोकार्पण करत गावातील सर्व लोकांना सुमधुर जेवणाची मेजवानी दिली. त्यांच्या या दानत्वाला, आईवडील व गावाप्रती असणाऱ्या प्रेमाला पाहून सर्व गाव भारावून गेले होते..


या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी समर्थ धाम नागपूरचे अध्यक्ष दिनकर कडू, उदघाटक बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरचे अध्यक्ष प्रा.अनिल काणेंकर सर, प्रमुख मार्गदर्शक कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे, प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. प्रशांत कडू, ज्ञानेश्वर रक्षक, देवीदास लाखे, , सरपंच प्रमोद प्रधान,उपसरपंच प्रशांत मेश्राम , रामचंद्र राऊत माजी गट नेता न. प. लाखांदूर, माजी सरपंच मोहन सोनकुसरे , सदाराम दिघोरे माजी सरपंच परसोडी, सौ.शारदा भानारकर सरपंच,आसोला संदिप कोरे सरपंच पहुनगाव पोलिस पाटील मोहन निमजे, पवण सामरत ,केवळराम मांढरे,जयसिंग, नान्हे ही प्रमुख मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती..


अध्यक्षीय भाषणात दिनकर कडू म्हणाले की तुलसीदास सारखा पुत्र या गावात जन्माला आला. हे या गावचे पुण्य आहे, आजच्या या काळात आईवडीलाना इतका सम्मान देणारा व आपल्या गावाप्रती इतकी आपुलकी असणाऱ्या या खऱ्या कर्मयोगीचं काम पाहून मी थक्क झालो आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पंकज ठाकरे यांनी गाव आदर्श निर्मितीवर बोलताना म्हणाले की सर्वप्रथम आपण, केंद्र सरकार, राज्य सरकार, खासदार, आमदार, सरपंच काय करते याचा विचार न करता मी माझ्या गावासाठी काय करू शकतो यावर विचार करावा व क्षणाचाही विलंब न करता कामाला लागावे. हाच विचार तुलसीदास भानारकर यांनी केला व ते आपलं गाव कर्मयोगीच्या माध्यमातून आदर्श करायला लागले. त्याबद्दल त्यांचे जितके कौतुक करावे तितके कमी. आता गावातील लोकांनी त्यांच्या या कार्याला मोठ्या प्रमाणात साथ द्यावी असे ते यावेळी आवर्जून म्हणाले..
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक
तुलसीदास भानारकर, संचालन प्रविणा ठाकरे व आभार प्रदर्शन मंगेश नंदेश्वर यांनी केलं, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकरी मंडळी व कर्मयोगी परिवाराने मोठ्या प्रमाणात यशस्वी मेहनत घेतली..

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!