July 1, 2025 10:06 am

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.

अपनी भाषा में पढ़े! Translate

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – 28 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन खोरवडी येथील ZP च्या शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.या विज्ञान प्रदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग, प्रतिकृती तयार करुन त्याचे उत्तम सादरीकरण केले.या विज्ञान प्रदर्शनास शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा सौ.शितलताई सोनवणे , इतर पालक व ग्रामस्थांनी भेट देऊन बालवैज्ञानिकांचे भरभरुन कौतुक केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कुतुहल व वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यास मदत मिळेल.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व प्रोत्साहन देण्यासाठी मुख्याध्यापक गौतम कांबळे ,उपशिक्षक अभिजीत कोंडेजकर ,हौशीराम गायकवाड ,श्रीमती नीता भद्रे , श्रीमती शितल कदम , श्रीमती साक्षी कोंडेजकर मॅडम या सर्वांचे व विद्यार्थ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.यावेळी शाळा व्यवस्थापनाने सर्वांचे आभार मानले .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!