नगरपालिकेने बिफ स्टॉल लिलाव प्रक्रिया रद्द करावी- भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी संघटनातर्फे निवेदन
अमळनेर – नगरपालिकेने बिफ स्टॉल लिलाव प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी संघटनातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र पाणी संरक्षण दुरुस्ती मसुदा १९८५ च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्यात गोवंश तसेच बैल वडू यांच्या हत्येवर प्रतिबंधक करण्यात आले असून अमळनेर नगर परिषदमार्फत यां संदर्भात जाहिरातीद्वारे वर्तमानपत्रात बिफ स्टॉल विक्रीची फी वसुलीबाबत जाहीर प्रकटन
देण्यात आले आहे. नगरपालिकेने परवाना देणे म्हणजे एका गोवंश हत्येसाठी कत्तल खाण्याची परवानगी देण्यासारखे असून सदर जाहिरात महाराष्ट्र पाणी संरक्षण दुरुस्ती मसुदा
१९८५ च्या तरतुदीला डावलण्याचे निदर्शनास आडळून आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक व धार्मिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून सदर
जाहीर लीला प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टी अमळनेरतर्फे नगरपालिका मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांनी या लिलावास तात्काळ स्थगिती देण्याचे आश्वासन दिले आहे.