June 30, 2025 9:22 pm

अमळनेर बसस्थानकच्या आवारातून सोन्याचे दागिने लंपास

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर बसस्थानकच्या आवारातून
सोन्याचे दागिने लंपास
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर बसस्थानक आवारातून महिलेच्या हातातील ६२ हजार ५०० रूपये किंमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अमळनेर बसस्थानक आवारात घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथील भारतीबाई वसंत पाटील (वय ५६ ) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या
निमित्ताने सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता त्या अमळनेर बसस्थानक आवारात आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांने त्यांच्या हातातील ६२ हजार ५०० रूपये किंमतीच २५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने सोन्याच्या बांगडीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २० फेब्रुवारी
रोजी दुपारी २ वाजता त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील
तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!