June 29, 2025 2:26 pm

‘सेल्फी घेऊन, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत’, अजित पवारांकडून सुप्रिया सुळे लक्ष्य

अपनी भाषा में पढ़े! Translate

‘सेल्फी घेऊन, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत’, अजित पवारांकडून सुप्रिया सुळे लक्ष्य

(निलेश गायकवाड )

“आपल्याला बारामतीचा, महाराष्ट्राचा विकास करून घ्यायचा आहे. यासाठी नुसता खासदार निवडून द्यायचा आणि त्याने संसदेत फक्त भाषणं करायची, यातून प्रश्न सुटत नाहीत. मी मतदारसंघात न येता, मुंबईत बसून उत्तम संसदपटू म्हणून खिताब मिळविला असता तर मतदारसंघातील कामं झाली असती का? नुसतं सेल्फी घेऊन कामं होत नसतात”, अशा शब्दात अजित पवार यांनी बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता टीका केली. सुप्रिया सुळे यांना आजवर अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. सुप्रिया सुळेंच्या समर्थकांकडून त्यांचा उल्लेख संसदरत्न असा करण्यात येतो. याचाच धागा पकडत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. तसेच त्यांच्याविरोधात कोणता उमेदवार देणार याचेही सुतोवाच केले.

भावनिक होऊन भाकरीचा प्रश्न सुटत नाही

“लोकसभा निवडणुकीत काही लोक भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. पण भावनिक होऊन भाकरीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक होऊन कामं होतं नाहीत. कामं तडफेनेच करावी लागतात. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. बारामतीकरांनी मला याआधी विक्रमी मतांनी निवडून दिले आहे. त्याचप्रमाणे आमच्या लोकसभेच्या खासदारालाही विक्रमी मतांनी निवडून द्या, असेही आवाहन अजित पवार यांनी केले. इंदापूर, भोर, दौंड, वेल्हा, मुळशी, खडकवासला, पुरंदर येथेही मी भूमिका मांडणार आहे. पण बारामतीमधील कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथवर आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडायची आहे”, अशाही सूचना अजित पवार यांनी दिल्या.

सुप्रिया सुळेंसमोर नवखा उमेदवार देणार
“आतापर्यंत जे खासदार तीन-चार वेळा निवडून गेले होते, त्यापेक्षा आपला खासदार नवखा असून पहिल्यांदाच निवडून जाणार आहे. पण हा खासदार जास्त कामं करेल, हा अजित पवारचा शब्द आहे. काही लोक म्हणतील की, खासदार पहिल्यांदाच निवडून जात आहे, तर काम कसं करेल? तर त्याबाबत तुम्ही निश्चिंत रहा. खासदाराच्या बाजूला असलेली आमच्यासारखी लोकं अनुभवी आहेत”, असे सांगून अजित पवार यांनी बारामतीचा उमेदवार हा पहिल्यांदाच निवडणूक लढविणारा असल्याचे सुतोवाच केले आहे.

मला आणि ‘माझ्या’ कुटुंबाला एकटं पाडलं जाईल
“आमच्या घरातील शरद पवार हे एकमेव वरिष्ठ आहेत. बाकीचेही आहेत पण ते पुण्यात असतात. माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधात प्रचार करतील. माझ्या घरातले बाकीचे सगळे माझ्या विरोधात गेले तरी ही जनता माझ्यासोबत आहे. प्रत्येकाला प्रचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण मला एकटं पाडण्यासाठी कसे काहीजण जीवचं रान करतात ते बघा,” असा टोला अजित पवार यांनी लगावला.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!