June 30, 2025 4:56 pm

कर्नाटक (कोटापुरा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना.

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्नाटक (कोटापुरा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना…. 
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची दौंड येथील आंबेडकरी संघटनेची मागणी.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – कर्नाटक राज्यातील कलबुर्गी (कोटापुरा) या शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. विटंबना करणाऱ्या मनुवादी व जातीयवादी लोकांवर कठोर कारवाई करावी व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वत्र होत आहे अशा प्रकारच्या मनुवादी विचारसरणीच्या व जातीयवादी लोकांना दौंड येथील आंबेडकर अनुयायांनी एक इशारापर मोलाचा संदेश दिला आहे जातीयवाद्यांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कधीही संपत नसतात या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व त्यांच्या संविधानाची गरज आहे अशा बुरसटलेल्या मनवादी विचारसरणीच्या जातीय गावगुंडांचा दौंड शहरातील तमाम आंबेडकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला या जातीयवादी समाजकंटकांना त्वरित पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व यामागे कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा अन्यथा दौंड मधील सर्व आंबेडकरी विचाराचे पक्ष व भीम अनुयायी तसेच अनेक संघटनेच्या वतीने प्रचंड मोठा महामोर्चा काढण्यात येईल .
भारत सरोदे आरपीआय नेते, अमित सोनवणे, पांडुरंग गायकवाड, बाबा कोरी , जालिंदर सोनवणे, अनिल साळवे, सतीश थोरात आरपीआय, फिरोज कांबळे, सुभाष गायकवाड, दिगंबर पवार, मयूर उदावंत, विकास कदम ,सागर उबाळे, मयूर सोनवणे सामाजिक कार्यकर्ते, संजय चितारे यांच्या सहीने दौंड पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले . यावेळी शहरातील समस्त भिम अनुयायी व बहुजन बांधव उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!