June 30, 2025 5:09 pm

कर्मयोगी शंकराराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी संपत बंडगर यांची निवड…

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्मयोगी शंकराराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी संपत बंडगर यांची निवड…

(निलेश गायकवाड )

भिगवण – येथील कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी कारखान्याच्या नियुक्त तज्ञ संचालक पदी मदनवाडी ता. इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व भिगवण शेटफळ गटाचे गटनेते संपत बंडगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत त्याचा सत्कार करण्यात येऊन त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.सदर निवड ही माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

बंडगर हे कारखान्याचे सभासद असून कारखान्याच्या वाटचालीत सक्रिय असतात.यावेळी बंडगर म्हणाले, कारखान्याचे कामकाज चांगल्या पद्धतीने सुरू आहे. माझी कारखान्याच्या कामकाजात नेहमी सहकार्याची भूमिका राहिल. नियुक्ती बद्दल त्यांनी संचालक मंडळाचे आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!