June 30, 2025 10:22 am

सरस्वती विद्यालयात स्व. तात्यासो. प्रल्हादराव पाटील यांना विनम्र अभिवादन

अपनी भाषा में पढ़े! Translate

सरस्वती विद्यालयात स्व. तात्यासो. प्रल्हादराव पाटील यांना विनम्र अभिवादन

श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती शिशु प्राथमिक व माध्यमिक विद्यालय शिरपूर येथे तालुक्याचे माजी आमदार शेतकरी व कामगारांचे झुंजार नेते स्वर्गीय तात्यासो. प्रल्हादराव माधवराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप लोहार, विश्वस्त श्री राजेंद्रसिंग राजपूत, श्री राधेश्याम गुप्ता, श्रीमती शोभाताई मोरे , नगरसेवक श्री हेमंत भाऊ पाटील, श्री शेखर भाऊ खरे, श्री अमोल पाटील व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व पुष्पांजली अर्पण करण्यात आली..
आपले मनोगत व्यक्त करताना श्रीमती शोभाताई मोरे यांनी तात्यांचे आदर्श व विचार घेऊन ते व त्यांच्या परिवार वाटचाल करीत असून समाजाप्रती असलेले देणं व लोकसेवेच्या वसा त्यांच्या परिवार यापुढेही कायम ठेवेल व हिच खरी तात्यांना श्रद्धांजली ठरेल असे सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!